Pune Vadgaon Sheri Vidhansabha Election : वडगाव शेरी मतदारसंघाचे (Vadgaon Sheri Vidhansabha) उमेदवार बापूसाहेब पठारे (Bapu Pathare) यांनी उमेदवारी अर्ज भरताना जोरदार शक्ती प्रदर्शन केले होते. लोकांचा मिळालेला प्रतिसाद पाहून विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी सुरेंद्र पठारे यांनी विरोधकांवर टीका केली आहे. पराभव समोर दिसत असल्याने विरोधकांकडून रडीचा डाव खेळला जात असल्याचे ते म्हणाले.
वडणूक आयोगाकडून दुजाभाव केला जात असल्याचा आरोप
वडगाव शेरी विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार बापूसाहेब तुकाराम पठारे आहेत. मात्र त्यांचेत नाव असलेल्या एका व्यक्तीने वडगाव शेरीतून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावरुन सुरेंद्र पठारे यांनी विरोधकांवर टीका केली. यावेळी बोलताना सुरेंद्र पठारे म्हणाले की श्रीगोंदा येथील रहिवासी असलेल्या बापू बबन पठारे या व्यक्तीने उमेदवारी अर्ज भरण्यासाठी पंधरा मिनिट शिल्लक असताना आपला अर्ज दाखल केला. विरोधातील उमेदवाराचा भाऊ या डमी उमेदवाराला घेऊन अर्ज दाखल करण्यासाठी आला होता. दरम्यान याबाबतीत आता निवडणूक आयोगाकडून दुजाभाव केला जात असल्याचा आरोप सुरेंद्र पठारे यांनी केला.
बापू बबन पठारे या उमेदवाराचे अॅफीडेव्हीट अद्यापही जाहीर नाही
सुरेंद्र पठारे म्हणाले की, उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या सर्वच उमेदवारांचे अॅफीडेव्हीट निवडणूक आयोगाने जाहीर केले. मात्र बापू बबन पठारे यांचे अॅफीडेव्हीट अद्यापही जाहीर केले नाही असा आरोप सुरेंद्र पठारे यांनी केला. या डमी उमेदवारांनी घेतलेल्या कर्जाची नोंद नाही, त्याच्या नावे किती मालमत्ता आहे, बँक बॅलन्स किती आहे याची देखील माहिती निवडणूक आयोगाने दिली नाही. खरंतर उमेदवारी अर्ज भरणाऱ्या उमेदवारांनी त्याची सर्व माहिती लोकांसमोर मांडली पाहिजे अशी अट आहे. मात्र या उमेदवाराच्या बाबतीत कुठलेच नियम पाळण्यात आले नाहीत. निवडणूक आयोगाच्या या कामकाजावर सुरेंद्र पठारे यांनी आक्षेप घेतला असून कुठल्याही नियमांचे पालन न करणाऱ्या बाप्पू बबन पठारे या उमेदवाराचा अर्ज रद्द करण्यात यावा अशी मागणीही त्यांनी केली.
पुण्यातील वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातून आजी-माजी आमदार इच्छुक होते. अजित पवारांच्या पक्षाचे विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांना वगळून आपल्याला उमेदवारी मिळेल, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी आपल्याला तसे आश्वासन दिल्याचा दावा भाजपचे माजी आमदार जगदिश मुळीक यांच्याकडून करण्यात आला होता. मात्र, पुन्हा सुनिल टिंगरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुं या मतदारसंघात बापू पठारे विरुद्ध सुनिल टिंगरे असा सामना होणार आहे.