पुणे : पुण्यात बनणाऱ्या कोवॅक्सीन लसीचं 50 टक्के उत्पादन महाराष्ट्राला मिळवण्यासाठी अधिकाऱ्यांना भारत बायोटेकसोबत चर्चा करण्याचे निर्देश दिल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलीय. ही लस नियमानुसार सर्वत्र पुरवली जाईल. पण मी अधिकाऱ्यांना लस महाराष्ट्राला देण्यासाठी प्रयत्न करायला सांगितलं आहे. "इथे निर्माण होणारी लस निम्मी केंद्र सरकारला द्यावी लागेलच. पण निम्मी लस राज्याला मिळाली तर इथल्या नागरिकांना फायदा होईल, असे अजित पवार म्हणाले.
अजित पवार म्हणाले की, "भारत बायोटेकने पुणे जिल्ह्यात लस निर्मिती करण्यासाठी वीस एकर जमीन मागितली होती, आम्ही ती तात्काळ दिली. जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांनी तिथे भेट दिली. तिथे वीज, पाणी वगेरे सुविधा तात्काळ दिल्या जात आहेत. ही लस नियमानुसार सर्वत्र पुरवली जाईल. पण मी अधिकाऱ्यांना लस महाराष्ट्राला देण्यासाठी प्रयत्न करायला सांगितलं आहे. "इथे निर्माण होणारी लस निम्मी केंद्र सरकारला द्यावी लागेलच. पण निम्मी लस राज्याला मिळाली तर इथल्या नागरिकांना फायदा होईल. असे झाल्यास राज्यातील लसीकरण वेगाने होण्यास मदत होणार आहे.
पुण्यात लॉकडाऊन केला म्हणून रुग्णसंख्या आटोक्यात आली..
पुण्यात लॉकडाऊन केला म्हणून रुग्णसंख्या आटोक्यात आली, असं केंद्र सरकारचे अधिकारीच सांगतात. पण लॉकडाऊन करताना किती त्रास झाला, हे आम्हालाच माहित. त्यामुळे लोकांनी जरा सबुरीने घ्यावं, असं वक्तव्य पालकमंत्री अजित पवार म्हणाले. पुण्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत बोलत होते.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्याची तयारी सुरु केली आहे. या लाटेत लहान मुलांना लागण होऊ शकते, असे इशारा टास्कफोर्स तसंच तज्ज्ञांनी दिला आहेत. तीन हजार मेट्रिक टन ऑक्सिजन निर्मिती करण्याचे राज्य सरकारचे ध्येय आहे. ऑक्सिजन किती आला आणि कुठल्या राज्याला किती देण्यात आला हे पारदर्शकपणे केंद्र सरकारने सांगायला हवे, असं अजित पवार म्हणाले.
पुणे महापालिकेचे सभागृह नेते गणेश बीडकर यांनी पुणे महापालिकेला लस खरेदीसाठी ग्लोबल टेंडर काढण्याची परवानगी द्यावी अशी मागणी केली आहे. यासाठी राज्य सरकारची परवानगी गरजेची आहे. मुंबई महापालिकेने आपल्या स्तरावर ग्लोबल टेंडरचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकार परवानगी देत नाही असं नाही. पण मुळात लसच उपलब्ध नाही, असं अजित पवार यांनी सांगितलं.