पुणे : पात्रता परीक्षेतील घोटाळ्यात पुणे पोलिसांनी कारवाईचा फास आणखी घट्ट केला आहे.  आता म्हाडा परीक्षा फुटीप्रकरणी तीन दलाल तर दोन आरोपींना टीईटी घोटाळ्यात अटक करण्यात आली आहे. शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी 2018 च्या परीक्षेतील गैरव्यवहार प्रकरणात ही कारवाई झाली आहे.


 यामध्ये नाशिकच्या अगोदे गावचा मुकुंदा जगन्नाथ सूर्यवंशीने ऑक्टोबर 2018 मध्ये परीक्षार्थींची यादी पेनड्राईव्हमध्ये दिली होती. आणि परीक्षार्थींकडून घेतलेले 80 लाख रूपयांची रोख रक्कम एजंट संतोष लक्ष्मण हरकळ आणि अंकुश रामभाऊ हरकळ यांना आणून दिल्याचे तपासात निष्पन्न झाल असल्याचं सायबर पोलिसांनी सांगितले. हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असून, गुन्ह्याची व्याप्ती खूप मोठी आहे. त्यामुळे आरोपी मुकुंदा सूर्यवंशीकडे सखोल तपास करणे आवश्यक आहे. यापूर्वी अटक केलेल्या संतोष हरकळ आणि अंकुश हरकळ या आरोपींना परीक्षार्थींची यादी पेनड्राईव्हमध्ये दिली. ते परीक्षार्थी नक्की कोणते आहेत त्यांची नावे अटक आरोपींकडून प्राप्त करायची आहेत. तसेच टीईटी 2018 च्या परीक्षेमध्ये मार्क वाढविण्यासाठी परीक्षार्थी कोणामार्फत आरोपींच्या संपर्कात आले आहेत त्यांनी कोणाच्या मार्फत सूर्यवंशीला पैसे दिलेले आहेत. एकूण किती पैसे दिले आहेत. याबाबत सखोल तपास करायचा आहे. यासाठी न्यायालयाने आरोपीला 21 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.


दरम्यान, यापूर्वी जी ए. टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा संचालक डॉ. प्रितिश देशमुख आणि शिक्षण विभागाचा तांत्रिक सल्लागार अभिषेक सावरीकर यांच्या सांगण्यावरून जी. ए. सॉफ्टवेअर कंपनीचा तत्कालीन संचालक आश्विनकुमार शिवकुमार (रा. बंगळूर) याला पाच कोटी 37 लाख रुपये देण्यात आल्याचे पोलिस तपासात उघडकीस आले होते. याप्रकरणात अटक करण्यात आलेले एजंट संतोष हरकळ आणि अंकुश हरकळ यांनी नाशिक, जळगाव, जालना, बुलढाणा जिल्ह्यातील पाच एजंटाकडून हे पैसे जमा केले होते. त्यानंतर डॉ. देशमुख आणि सावरीकर यांच्या सांगण्यावरून ते शिवकुमार याला दिले. आश्विनकुमार याने टीईटी -2018 मधील 600 ते 700 परीक्षार्थींचे गुण वाढविण्यासाठी त्यास मिळालेल्या पाच कोटी रुपयांपैकी दोन कोटी जी.ए.सॉफ्टवेअर कंपनीचा संस्थापक गणेशन याला राज्य परीक्षा परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष सुखदेव डेरे यांना 20 लाख रुपये तर शिक्षण परिषदेचा आयुक्त तुकाराम सुपे यास 30 लाख रुपये दिले असल्याचे निष्पन्न झाले आहे.


संबंधित बातम्या :


TET घोटाळ्यानंतर आरोग्य पेपरफुटी प्रकरणाला वेग; आणखी एका आरोपीला अटक


TET Exam Scam: अपात्र शिक्षकांची पत्त्यांसह यादी तयार, लवकरच कारवाईचा बडगा




TET Exam Scam: टीईटी परीक्षा घोटाळ्यात IAS अधिकाऱ्याचा हात, कृषी खात्याच्या उपसचिवाला अटक


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha