Pune Fire : पिंपरी चिंचवडमध्ये (Pimpri Chindchwad) रविवारी नऊ गॅस टाक्यांचा स्फोट (Pune Gas Tank Blast) झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेमागे एक धक्कादायक कारण समोर आलं आहे. ही आग गॅस चोरीचा काळाबजार करत असताना घडली असल्याचं सांगण्यात येत आहे. ज्याठिकाणी गॅस टँकरचा स्फोट झाला, त्या परिसरात शाळा, महाविद्यालये, विद्यार्थ्यांचे हॉस्टेलसुद्धा आहेत



तब्बल नऊ टाक्यांचा स्फोट
पिंपरी चिंचवडमधील ताथवडे शहरात एका टँकरमधून गॅस चोरी करताना तब्बल नऊ टाक्यांचा स्फोट झाला. एकामागोमाग एक स्फोट झाल्यानं ताथवडे परिसरातील नागरिकांनी घराबाहेर धाव घेतली. आगीचे रौद्ररूप पाहून गॅस चोरीचा काळाबाजार करणाऱ्यांनी इथून पळ काढला. ज्या ठिकाणी आग लागली, त्याच्या बाजूलाच शाळा, हॉस्टेल आणि रहिवाशीही राहत होते. यात सुदैवाची गोष्ट म्हणजे या आगीच्या कचाट्यात कोणीच सापडले नाही, मात्र शाळेतील तीन वाहनं यात जळून खाक झाली आहेत. 



एक तासानंतर आग आटोक्यात
रविवारी रात्री पावणे अकरा वाजता लागलेली आग पावणे बाराच्या सुमारास नियंत्रणात आली. अग्निशमन दलाकडून आग लागलेल्या गॅस टॅंकरवर कुलिंग ऑपरेशन सुरू होते. आग आटोक्यात आणण्यात पुढचा तासभर तरी लागला. दुसरीकडे पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला असून टँकर चालकांसह गॅस चोरट्यांचा शोधही सुरू आहे. 


 



नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण


माहितीनुसार, गॅसच्या टाकीला आग लागल्याने हे मोठे स्फोट झाले, ज्यामुळे आजूबाजूच्या नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेमुळे या भागात काही काळ गर्दी देखील झाल्याचे पाहायला मिळाले. ज्या ठिकाणी घटना घडली त्याच्या बाजूच्या सोसायटीत नागरिकांची पळापळ झाली. दरम्यान, या स्फोटामुळे इथले नागरिक घाबरलेले आहेत. स्फोटचा आवाज होताच रात्री अनेक जण रस्त्यावर आले. या परिसरात शाळा, कॉलेज असल्यामुळे विद्यार्थ्यांचे हॉस्टेलही आहे. त्यामुळे विद्यार्थीही या स्फोटचा आवाज ऐकून बाहेर आले. त्यामुळे रस्त्यावर मोठी गर्दी देखील झाल्याचे पाहायला मिळाले.


 


सुदैवाने जीवितहानी नाही
गॅस टाकीचा एकामागोमाग स्फोटाचा आवाज झाल्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहचले असून आगीवर नियंत्रण मिळवण्यात त्यांना यश आले आहे. दरम्यान, आगीचे कारण अद्याप समजलेले नसून सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याची माहिती आहे. 


 


 



 


 


इतर महत्त्वाच्या बातम्या


Pune Drugs Special Report: जे येरवड्यात जमलं नाही; ते ससूनमध्ये शक्य ? रुग्णालयातूनच ड्रग्जचं रॅकेट