पुणे : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते  शरद पवार (Sharad Pawar)  हे अखेर भाऊबीज साजरी करण्यासाठी शेतकऱ्याच्या बांधावरुन थेट अजित पवारांच्या (Ajit Pawar) काटेवाडीत पोहचले. त्यांच्या अजित पवारांच्या घरी भाऊबीजेसाठी उपस्थितीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. अजित पवारांच्या काटेवाडीतील निवासस्थानी शरद पवार भाऊबीजेसाठी जाणार का?, अशा चर्चा रंगल्या होत्या मात्र शरद पवारांनी थेट काटेवाडीत जाऊन सर्वांसोबतच भाऊबीज साजरी केल्यानं राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे.


अजित पवारांच्या काटेवाडीतील निवासस्थानी आज भाऊबीज साजरी करण्यात आली. यावेळी संपूर्ण कुटुंब उपस्थित असल्याचं पाहायला मिळालं. अजित पवार, जय पवार, सुप्रिया सुळे, प्रतिभा पवार, पार्थ पवार, शर्मिला पवार, श्रीनिवास पवार, अजित पवारांच्या दोन बहिणी, रणजित पवार, जयंत पवार अजित पवारांच्या निवासस्थानी भाऊबीजेनिमित्त एकत्र आले होते. यंदा पवार कुटुंबियांच्या भाऊबीजेकडे राज्याचं लक्ष आहे. मात्र, भाऊबीजेनिमित्त शरद पवारांची काटेवाडीत हजेरी महत्वाची असणार होती.  संपूर्ण पवार कुटुंब एकत्र असताना  शरद पवारांची प्रतीक्षा होती अखेर शरद पवार अजित पवारांच्या निवासस्थानी पोहचले. यावेळी माजी मंत्री राजेश टोपेदेखील हजर होते. 


एकीकडे राष्ट्रवादी कोणाची यासंदर्भात निवडणूक आयोगाकडे संघर्ष सुरु आहे. तर दुसरीकडे पवार कुटुंबीय एकत्र दिवाळी साजरी करताना दिसत आहे. काल (14 नोव्हेंबर) गोविंद बागेत पाडव्या निमित्त मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी अजित पवार जातील की नाही, असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र अखेर अजित पवार या पाडव्याच्या कार्यक्रमासाठी पोहचले होतोे सुप्रिया सुळेंनी सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या फोटोत अजित पवार शरद पवारांच्या मागेच उभे असल्याचं दिसून आलं. त्यामुळे पवार कुटुंबियांमध्ये नेमकं चाललंय काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. 


सुप्रिया सुळेचं वक्तव्य खरं ठरलं?


राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर पवार कुटुंबियांची ही पहिलीच दिवाळी आहे. त्यामुळे पवार कुटुंब दिवाळी नेमकी कशी साजरी करतं, याकडे सर्व राजकीय क्षेत्राचं लक्ष लागलं होतं. दिवाळीत अजित पवार कुटुंबातील दिवाळीत सामील होणार का? असा प्रश्न पडला होता. सुप्रिया सुळेंनी धनत्रयोदशीला प्रतापराव पवार यांच्या पुण्यातील घरी झालेल्या छोटेखाणी दावतमध्ये मतभेत आहेत. मात्र, कुटुंब म्हणून एकत्र आहोत, असं वक्तव्य केलं होतं. त्या छोटेखाणी दावतमध्ये अजित पवार, सुनेत्रा पवारदेखील उपस्थित होत्या.


इतर महत्वाची बातमी-


Sharad Pawar : भाऊबीजेसाठी सुप्रिया सुळे अजित पवारांकडे पोहचल्या; शरद पवार काटेवाडीत जाणार का?