Pune Crime : पुण्यातील औंध भागातील 22 वर्षीय तरुणीचा खून करणाऱ्या प्रतिक ढमाले या युवकाने स्वतः देखील आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. पुण्यातील (Pune) बावधन भागात त्याचा मृतदेह आढळून आला आहे. काल (9 नोव्हेंबर) प्रतिक ढमालेने 22 वर्षीय श्वेता रानवडेचा राहत असलेल्या सोसायटीच्या पार्किंगमधे धारदार शस्त्राने खून केला होता. प्रतिक आणि संबंधित तरुणी मागील पाच वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते आणि दोघांच्या नातेवाईकांकडून त्यांच्या लग्नाची बोलणीही सुरु होती. मात्र मुलीकडच्या नातेवाईकांनी लग्नास नकार दिल्याने प्रतिक अस्वस्थ झाला होता. त्यातूनच त्याने या मुलीला सोसायटीच्या पार्किंगमध्ये भेटण्याचे कारण देऊन बोलावले आणि धारदार शस्त्रांच्या सहाय्याने तिचा खून केला. हत्येनंतर प्रतिक ढमाले फरार झाला होता. मात्र त्यानेही आत्महत्या केल्याचं उघड झालं आहे. 


वाद विकोपाला गेला अन् तरुणाने थेट खून केला
श्वेता औंध परिसरात राहायला होती. बुधवारी दुपारी दोघेजण भेटले होते. त्यावेळी दोघांमध्ये प्रेम प्रकरणावरुन वाद झाला. हा वाद विकोपाला गेला. दोघांनीही एकमेकांना जाब विचारण्यास सुरुवात केली. मात्र वाद एवढा वाढला की तरुणाला राग अनावर झाला. रागाच्या भरात तरुणाने खिशात असलेलं धारदार शस्त्र काढलं आणि तरुणीच्या अंगावर धावून गेला. तिच्यावर वार करण्यास सुरुवात केली. तरुणीने स्वत:चा बचाव करण्याचा प्रयत्न केला, मात्र तरुणी अपयशी ठरली. यात तरुणीच्या अंगावर गंभीर जखमा झाल्या. प्रेयसी गंभीर जखमी झाल्याचं लक्षात येताच आरोपी प्रियकरानं घटनास्थळावरुन पळ काढला. त्यानंतर उपस्थितांची तिथे गर्दी झाली, गर्दीमधील काही लोकांनी तरुणीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं, मात्र तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता. 


तरुणांना भीती नेमकी कशाची?
पुण्यात क्षुल्लक कारणावरुन हत्येच्या प्रमाणात सातत्याने वाढ होत असल्याचं चित्र आहे. पुण्याच्या बावधन परिसरात पूर्ववैमनस्यातून एका व्यक्तीचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली होती. पीतबसा कमलचंद जानी असं खून झालेल्या व्यक्तीचे नाव होतं. याप्रकरणी प्रदीप बलभीम राजोळे, आकाश कांबळे, आकाश पवार यांच्यावर हिंजवडी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पीतबसा यांच्यावर कोयत्याने वार करुन खून करण्यात आला होता. त्यांच्या डोक्यात, हातावर वार करण्यात आले. पीतबसा कमलचंद जानी यांचा पूर्ववैमनस्यातून खून करण्यात आला होता. पुण्यातील बावधन परिसरात या हत्येमुळे भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. त्यामुळे तरुणांना भीती नेमकी कशाची हा प्रश्न अनुत्तरित आहे.


संबंधित बातमी