पुणे :  पुण्यात (Pune News)  निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या मुलावर त्याच्या एक्स गर्लफ्रेंडचे फोटो आणि व्हिडीओ एका वेबसाईटवर पोस्ट केल्याप्रकरणी (Pune Crime News) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रेमसंबंध ठेवण्यास नकार दिल्याने हे कृत्य केल्याची माहिती आहे. अमेय अनिल दबडे (Amey Dabade) असे या तरुणाचे नाव आहे. अमेय हा कोंढवा ब्रुद्रुक परिसरात राहायला आहे. या सगळ्या प्रकरणाबाबत तरुणीने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात (Loni Kalbhor Station)  तक्रार दाखल (Case Filed)  केली होती. या तक्रारीवरून अमेयवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,तक्रारदार तरुणी आणि अमेय एकाच महाविद्यालयात शिकत होते. काही वर्ष दोघेही एकमेकांच्या प्रेमात होते. दोघांमध्ये वाद झाल्याने तरुणीने त्याच्याशी संबंध तोडले. त्यानंतर अमेयने तरुणीला पुन्हा त्याच्यासोबत येण्याची धमकी देण्यास सुरुवात केली. मात्र मुलीने नकार दिला. त्यानंतर त्याने मुलीचे छायाचित्र आणि ऑडिओ रेकॉर्ड सोशल मीडिया आणि वेबसाईटवर फिरवण्याची धमकी देण्यास सुरुवात केली. तरुणीने त्याच्या धमकीकडे दुर्लक्ष केले. काही वेळानंतर  मुलीला समजले की तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. तिने पोलिसांत तक्रार देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर अमेयच्या पालकांनी मुलीची माफी मागितली आणि आपापसात हे प्रकरण सोडवण्याचा प्रयत्न केला.


 यानंतर फेक अकाऊंटचा वापर करून तरुणीचा फोटो अश्लील वेबसाईटसह सोशल मीडियावर शेअर करण्यात आला. त्यानंतर मुलीने त्याला विचारले पण अमेयने काहीही केले नसल्याचे सांगत नकार दिला. त्यानंतर तरुणीने सायबर पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्यानंतर अमेयनेच तरुणीचे फोटो अपलोड केल्याच उघड झालं. या प्रकरणाचा पोलीस तपास करत आहे.


प्रेम प्रकरणातून धारदार शस्त्राने वार करत तरुणीची हत्या


पुण्यात क्षुल्लक कारणावरुन हत्येच्या प्रमाणात सातत्याने वाढ होत असल्याचं चित्र आहे.  गेल्या आठवड्यात  एका तरुणाचा बुधवारी प्रेमप्रकरणावरुन वाद झाला होता. हा वाद टोकाला गेला. त्याचवेळी तरुणाने जवळ असलेले शस्त्र काढून तिच्यावर हल्ला करायला सुरुवात केली. यात तरुणी गंभीर जखमी झाली. वार केल्यानंतर संबंधित तरुण पसार झाला. तरुणी रक्ताने माखलेली होती. त्यावेळी तरुणीला उपस्थित लोकांनी तातडीने नेण्यात आलं मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. 


संबंधित बातम्या :