Pune Suicide :  पुण्यात गुन्हेगारीचं आणि (Pune Suicide) आत्महत्येच्या प्रमाणात वाढ झाल्याचं मागील काह दिवसात घडलेल्या घटनांवरुन स्षष्ट होत आहे. पिंपरी चिंचवडमध्ये एका तरुणाने अकराव्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली आहे. आज सकाळी ही घटना घडली. विरेन जाधव असं 27 वर्षीय तरुणाचे नाव होते. तो खाजगी कंपनीत तो कामाला होता. 


हातात नोकरी होती, पण पगार अधिकचा नाही. सुखसुविधा तर आहेत, पण आयुष्यात मन लागत नाही. मग जगण्यात अर्थ काय, अशा मनस्थितीत तो आला होता. त्याचे डायरीत ही तसे उल्लेख आढळले. यातूनच त्याने हे टोकाचं पाऊल उचलल्याचे दिसून येत आहे. अशी माहिती चिखली पोलिसांनी दिली. तो आई-वडिलांसोबत राहत होता, वडील कामानिमित्त परगावी गेले होते. तर आई घरातच होती, तेंव्हा घराच्या बाहेर येऊन त्याने कॉमन पसेजमधून खाली उडी घेतली. यात त्याचा जागीच त्याचा मृत्यू झाला.


आत्महत्येनं पुणे हादरलं!


दोन दिवसांपूर्वीच एका घटनेने पिंपरि-चिंचवड हादरलं होतं. एका आयटी कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने 8 वर्षीय मुलगा आणि पत्नीही हत्या करुन स्वत: आत्महत्या केली होती. या घटनेमुळे शहरात चांगलीच खळबळ उडाली होती. ही घटना ताजी असतानाच पून्हा एका आत्महत्येनं शहर हादरलं आहे. पुण्याच्या औंध परिसरात राहणाऱ्या एका आय टी इंजिनिअरने पत्नी आणि मुलाची हत्या करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी घडली. मात्र असे टोकाचे पाऊल त्याने का उचलले, नेमकं याचं कारण काय आहे. यासंदर्भात पोलिसांनी उलगडा केला आहे. या व्यक्तीने नोकरी सोडून व्यावसाय सुरु करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी कर्जही घेतलं होतं. मात्र हा व्यवसाय उधारीत बुडाल्याने त्याने हा टोकाचा निर्णय घेतला असल्याची माहिती समोर आली. आयटी क्षेत्रात काम करत असलेल्या गांगुली यांनी काही आठ-नऊ महिन्यांपूर्वी नोकरी मधून ब्रेक घेऊन एक व्यावसाय करण्याचा निर्णय घेतला. आयटी मध्ये काम करत असलेला अनुभव असल्यामुळे त्याचा फायदा व्यावसायात होईल, असे वाटल्यामुळे त्याने ऑनलाईन भाजी विकण्यासाठी एक सॉफ्टवेअर तयार करायचे ठरवले. हा व्यावसाय बुडाल्याने त्यांनी टोकाचं पाऊल उचललं. 


तरुणांच्या आत्महत्येत वाढ...
पुण्यातच नाही तर महाराष्ट्रातील इतर शहरात तरुणांच्या आत्महत्येत वाढ झाली आहे. सर्व क्षेत्रास सुरु असलेली स्पर्धा यासाठी कारणीभूत असल्याचं बोललं जात आहे. मात्र या आत्महत्येमागची कारणंदेखील क्षृल्लक असल्याचं आतापर्यंतच्या घटनेतून समोर आलं आहे.