Ajit Pawar In Baramati: रोज वेगळ्या मुद्यावरुन वाद करण्यात काही अर्थ नाही. आज या ठिकाणी मशिद आहे यापुर्वी मंदिर होते. आपल्या श्रद्धास्थानाचा मुद्दा काढायचा आणि नवे प्रश्न निर्माण करायचे. चारशे पाचशे वर्षांच्या आधीचा इतिहास उकरुन काढायचा आणि कोणतेही संदर्भ द्यायचे. जे झालं ते झालं मात्र आता तुम्हाला काय करायचे आहे ते करा, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मशिदीच्या मुद्यावरुन भाजपवर निशाणा साधला. बारामतीत आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.


जीएसीबाबत अनेक सुचना केल्या आहेत. त्याची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. त्यामध्ये अनेक अडचणी आहेत हे आम्हालाही कळतात. जीएसटीबाबत केंद्र सरकार प्रचंड आग्रही आहे. तुम्ही सांगितलेल्या सगळ्या अडचणी आम्ही केंद्रासमोर मांडू. त्यावर काय तोडगा काढता येईल हे पाहु. तुम्ही मात्र याकडे दुर्लक्ष करु नका, असा सल्ला यावेळी बांधकाम व्यवसायिकांना अजित पवारांनी दिला. 


लाडकी-निंबोडी योजनेवरुन अनेकदा टीका होते. त्यावर अजित पवारांनी भाष्य केलं. ते म्हणाले, मुख्यमंत्री किंवा उपमुख्यंमंत्री कोणत्या जिल्ह्याला मिळतो. त्या जिल्हाची पाण्याची अवस्था काय आहे? तुम्ही मतदान केलं. तुम्हीच लोक निवडून दिलेत मला फार कोणावर टीका करायची नाही, असंही ते म्हणाले.


शांतता भंग करायची. वातावरण गढूळ करायचं, कायदा आणि सुव्यवस्था अडचणीत आणायची. कोण काय म्हणतात? त्यावर अनेकांची मत घ्यायची त्या मतांवरुन काही स्पष्ट होणार नाही आहे. कोण काय म्हणतात यावर माझं काहीएक म्हणणं नाही आहे. प्रत्येकच गोष्टीवर प्रतिक्रिया द्यायलाच हवी असं काही अनिवार्य नाही, असंही खडेबोल अजित पवारांनी सुनावले. 


राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद  पवार यांनी पुण्याती दगडूशेठ गणपतीचं मंदिराबाहेरुन दर्श घेतलं होतं. त्यावरुन ते खरंच नास्तिक आहेत का?, अशी चर्चा रंगली होती. त्यावर अजित पवारांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार मंदिरात नाही गेले तर ते नास्तिक आहेत? अरे काय चाललंय? हे तुम्ही दाखवायचं बंद करा. म्हणजे बोलणारेही बंद होतील, असं अजित पवार माध्यमांना उद्देशून म्हणाले.


 


 


 


 


 


 


 `