पिंपरी चिंचवड : कोरोनामुळं पिंपरी चिंचवडमध्ये हृदय पिळवटून टाकणारी एक घटना घडली आहे. जुळ्या गोंडस बाळाला जन्म देणाऱ्या कोरोना बाधित आईचा अवघ्या चोवीस तासांत मृत्यू झालाय. त्यामुळे कोरोनाचा हा नवा स्ट्रेन गरोदर महिलांसाठीही धोकादायक ठरत असल्याचं तज्ञ सांगतायेत.  


कोरोनाने जुळ्या चिमुकलींच्या डोक्यावरील मायेचं छत्र हरपून घेतलंय. मायेची ऊब घेण्याचं नशीब देखील या बाळांच्या नशिबी आलं नाही. कारण कोरोना बाधित आईचा प्रसूतीनंतर अवघ्या चोवीस तासात मृत्यू झालाय. ही दुर्दैवी आणि हृदय पिळवटून टाकणारी ही घटना पिंपरी चिंचवडमध्ये घडलीये.


4 एप्रिलला ऑक्सिजन खालावल्याने 36 वर्षीय महिला पिंपरी पालिकेच्या वायसीएम रुग्णालयात दाखल झाली. तेंव्हा अँन्टीजेन चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह असल्याचं स्पष्ट झालं. 5 एप्रिलला सीझर केल्यानंतर तिने जुळ्या गोंडस बाळांना जन्म दिला. बाळांची कोरोनाची अँन्टीजेनही निगेटिव्ह आली. पण दोन्ही चिमुकल्या आईच्या कुशीत येण्याआधीच, त्यांच्या आईला कोरोनाने हिरावून घेतलं.


पिंपरी महापालिकेच्या रुग्णालयात सध्या वीस कोरोना बाधित गरोदर महिला उपचार घेतायेत. पैकी पाच महिला आयसीयूमध्ये दाखल आहे. त्यामुळे कोरोनाचा नवा स्ट्रेन हा गरोदर महिलांसाठी घातक ठरत असल्याचे दिसत असल्याचे वायसीएम रुग्णालयाचे डॉ. विनायक पाटील यांना सांगितले. 


प्रसूतीची वेळ जवळ आली की अनेक गरोदर महिलांना त्रास जाणवत असतो. पण तो त्रास रुटीन भाग आहे. असं समजून ते अंगावर काढणं गरोदर महिला आणि बाळाच्या दृष्टीने धोकादायक ठरू शकतं. तेव्हा अशा वेळी डॉक्टरांच्या सल्ला नक्की घ्या आणि पुढचा धोका टाळा.