Pune PFI School :   शिक्षणाचं माहेरघर असलेल्या पुण्यातून (Pune PFI School) धक्कादायक (PFI) बातमी समोर आली आहे. दहशतवादी कारवायांचं प्रशिक्षण दिल्याचा आरोप करत एनआयएने पुण्यातील कोंढवामधील ज्या शाळेचे दोन मजले सील केले होते  ती शाळाचं अनधिकृत असल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) त्यांच्या कारवाईमध्ये या शाळेत  विद्यार्थ्यांना रायफल चालवण्याचं प्रशिक्षण देतात, असा दावा केला होता.


पुण्यातील कोंढवा परिसरातील "ब्ल्यू बेल्स हाय स्कूल" या शाळेत विद्यार्थ्यांना रायफल चालवण्याचं प्रशिक्षण देत असल्याचा आरोप  NIAने केला आहे. त्यानंतर ही शाळा अनधिकृत असल्याचं समोर आलं आहे. आता या शाळेवर कारवाई करण्यात येणार आहे. शाळेवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाने केलेल्या चौकशीमध्ये या शाळेकडे बोगस मान्यता प्रमाणपत्र असल्याचे समोर आलं आहे. तत्कालीन शिक्षण उपसंचालक यांच्या स्वाक्षरीचे पत्र या शाळेकडे आहे. मात्र या पत्राचा आवक जावक क्रमांक शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे उपलब्ध नाही.


या शाळेकडे असणाऱ्या मान्यता पत्रावरील तत्कालीन शिक्षण उपसंचाल  यांची स्वाक्षरी बनावट आहे.  ब्ल्यू बेल्स ही  स्वयंम अर्थसाहित शाळा असून 2019 मध्ये ती सुरू झाली होती. या शाळेत इयत्ता पहिली ते बारावी पर्यंतचे वर्ग शाळेत सुरू आहेत. या  शाळेकडे उपलब्ध असणारे पुणे विभागीय शिक्षण उपसंचालकांचे मान्यता प्रमाणपत्र देखील बोगस आहे. राज्य शासनाचे मान्यता प्रमाणपत्र खरे आहे की खोटे याबाबतची माहिती तपासणार आहे. 


शाळेच्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावर  रायफल चालवण्याचं प्रशिक्षण


पुण्यातील कोंढवा परिसरात ब्लू बेल्स हायस्कूल नावाची शाळा आहे. या शाळेच्या इमारतीच्या चौथ्या आणि पाचव्या मजल्यावर पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियातर्फे (PFI) मुस्लिम तरुणांना कट्टरपंथीय बनवण्यासाठी शिबिर घेतली जात होती. तसंच हल्ल्यांसाठी प्रशिक्षण देत होती. विद्यार्थ्यांना रायफल चालवण्याचं प्रशिक्षण देत, असा स्पष्ट दावा NIA ने केला. काही महिन्यापूर्वी PFI देशभरात कारवाई करण्यात आली होती. त्यावेळी या शाळेवरदेखील कारवाई करण्यात आली होती.  त्यानंतर या शाळेची NIA ने झडती घेतली होती. त्यावेळी काही दस्ताऐवज शाळेतून जप्त करण्यात आला होता. या प्रकरणाचा खटला दिल्लीत सुरु आहे. एनआयएने  22 सप्टेंबर रोजी शाळेच्या आवारातल्या दोन मजल्यांची झडती घेतली होती. जप्त केलेल्या काही दस्तऐवजांनुसार या मालमत्तेचा वापर आरोपींनी केडरसाठी शस्त्र प्रशिक्षण देण्यासाठी केल्याचं आढळून आलं.