Lonavala Rain: पुण्यात मुसळधार पावसाने (Pune Heavy Rain) हजेरी लावली आहे. आज पुण्याला हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. तर आज जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाची (Heavy Rain) शक्यता आहे. तर लोणावळ्यात पावसाचे प्रमाण  (Lonavala Rain Update) वाढले असून भुशी धरणाने धोक्याची पातळी ओलांडली आहे, त्यामुळे पर्यटकांची पंढरी समजल्या जाणाऱ्या भुशी धरणाच्या सांडव्यावरून पावसाचे पाणी वेगाने वाहत असल्याने, लोणावळा पोलिसांनी सुरक्षेसाठी पर्यटकांना भुशी धरणावर जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे त्यामुळे भुशी धरण परिसर निर्मनुष्य झाले असून, भुशी धरणाचे पांढरे शुभ्र पाणी वाहत असल्याचं चित्र भुशी धरणावर दिसून येत आहे.


लोणावळा परिसरात  (Lonavala Rain Update) धोधो पाऊस सुरू असल्याने, सकल भागात पाणी साचल्याने रस्ते झाले जलमय झाले आहेत. नांगरगाव रस्ता देखील पाण्याखाली गेला आहे. बापदेव रोड व नारायणी धाम मंदिरासमोरील रस्ता हा देखील पाण्याखाली गेला आहे. पांगारे वस्ती येथील राजू बोराटे यांच्या घरामध्ये पाणी शिरले आहे. जी वॉर्ड मधील निसर्ग नगरी मध्ये देखील पाणी घुसले आहे. वाकसई, कार्ला, मळवली, देवले परिसरात पाण्याचा विळखा पडला आहे. रस्त्यावर पाणी साचल्याने वाहन चालकांना वाहन चालवताना कसरत करावी लागत आहे.


लोणावळा शहरात 24 तासात 232 मिमी पावसाची नोंद, सतर्कतेचा इशारा


लोणावळा (Pune Heavy Rain) परिसरात शहरात मुसळधार पाऊस (Pune Heavy Rain) कोसळत आहे. 24 तासांत लोणावळा शहरात 232 मि.मी. (9.13 इंच) पावसाची नोंद झाली आहे. तर आज पहाटेपासून पावसाने पुन्हा जोर पकडला असून पावसाची लोणावळ्यात (Lonavala Rain Update) जोरदार बॅटिंग सुरू आहे. 


एकविरा आईच्या गडावर पावसाचा हाहाकार, धबधबे वाहू लागले ओसंडून


पुण्यासह जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. आज पुण्याला हवामान विभागाने रेड अलर्ट दिला आहे. लोणावळ्यात पावसाचे प्रमाण वाढले असून भुशी धरणाने धोक्याची पातळी ओलांडली आहे, त्यामुळे पर्यटकांची पंढरी समजल्या जाणाऱ्या भुशी धरणाच्या सांडव्यावरून पावसाचे पाणी वेगाने वाहत असल्याने, लोणावळा पोलिसांनी सुरक्षेसाठी पर्यटकांना भुशी धरणावर जाण्यास मज्जाव केलाय त्यामुळे भुशी धरण परिसर निर्मनुष्य झाले असून, भुशी धरणाचे पांढरे शुभ्र पाणी वाहत असल्याचं चित्र भुशी धरणावर दिसून येत आहे.


पिंपरी चिंचवडमधील मोरया गणपती मंदिरात पुन्हा पाणी शिरले


पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस (Heavy Rain) होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे, धरण क्षेत्र आणि घाटमाथ्यावर अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आल्यानंतर पवना नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. याच पवनेचे पाणी पिंपरी चिंचवडकर यांचे श्रद्धास्थान असलेला मोरया गोसावी मंदिरामध्ये साचायला सुरुवात झाली आहे, सध्या पवना धरणातून 7070 क्यूसेक इतका पाण्याचा विसर्ग करण्यात आला असल्यामुळे, मुख्य संजीवन समाधी मंदिराच्या पायरीला हे पाणी पोचले आहे, दरम्यान सकाळी दहाच्या सुमारास विसर्ग अजून वाढवण्यात येणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिले त्यामुळे हे मंदिर पूर्णपणे पाण्याखाली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.