पुणे : वर्षाविहारासाठी लोणावळ्यातील (Lonawala Bhushi Dam)  भुशी डॅम परिसरात पर्यटनासाठी  आलेले एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेले आहेत.भुशी धरणाच्या पाठीमागे असलेल्या डोंगरातील वॉटर फॉल येथून हे अन्सारी कुटुंब वाहून गेले आहेत. ग्रामस्थ,  वन्यजीव रक्षक, पोलीस यांच्या मदतीने  शोधमोहीम सुरू आहे मात्र, त्याचा शोध लागला नाही. 


भुशी धरणाच्या पाठीमागे असलेल्या डोंगरातील धबधब्याला रेल्वेचा वॉटर फॉल म्हणून ओळखलं जातं.अन्सारी कुटुंब  रविवारी परिवारासोबत  वर्षाविहारासाठी या परिसरात  आले होता. पाण्याच्या प्रवाहात भिजण्याचा आनंद घेण्यासाठी कुटुंब . मात्र, पाण्याला वेग असल्याने  वाहून गेले. ऐकमेकांना वाचवण्यासाठी प्रयत्नात वाहून गेल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. धबधब्यातील पाण्याचा प्रवाह भुशी धरणात येते, तिथं  शोधकार्य सुरू आहे. आतापर्यंत दोन जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. वाहून गेलेल्यांपैकी   लहान मुलांचा आणि महिलांचा समावेश आहे.  


लोणावळ्याचं भुशी धरण ओव्हरफ्लो


पर्यटकांची पंढरी समजल्या जाणाऱ्या लोणावळ्यातील भुशी धरण ओव्हरफ्लो झाले आहे.  लोणावळा परिसरात शुक्रवार, शनिवारी झालेल्या जोरदार पावसाच्या सरी आणि आज रविवारी सकाळपासून झालेला पाऊस यामुळे भुशी धरणाच्या सांडव्यावरून पाणी वाहू लागले आहे.


हुल्लडबाजी जीवावर


पावसाळा आला की पुणेकरांचे सहलीचे प्लॅन असतात त्यात लोणावळ्याच्या भुशी डॅमवर पर्यटक गर्दी करतात. पावसाळ्यात लोणावळ्याचं वातावरण आल्हाददायक असतं. त्यामुळे हजारो पर्यटक या ठिकाणी पर्यटनासाठी येत असतात. मात्र काही पर्यटक जीवावर बेतणारे खेळ करतात. त्यामुळे दुर्घटना होते आणि परिणामी जीव जातो. त्यामुळे पर्यटकांनी अतातायीपणा करु नये, असं आवाहन पोलिसांकडून करण्यात येतं. मात्र पोलिसांकडे दुर्लक्ष करुन अनेक तरुण हुल्लडबाजी करताना दिसतात. लोणावळ्यात दरवर्षी अशी प्ररिस्थिती बघायला मिळते. त्यामुळे लोणावळ्यातील प्रत्येक पर्यटनाच्या ठिकाणी स्पीकरवरुन खबरदारीच्या सूचना दिल्या जातात. शिवाय काही ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त देखील असतो. वारंवार पोलिसांकडून आवाहन केलं जातं. सूचना दिल्या जातात. मात्र पर्यटक याकडे दुर्लक्ष करताना दिसतात.  


दुर्घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ


मावळ तालुक्यात भुशी धरण, लोणावळ्यातील विविध पॉईंट्स, गड-किल्ले, लेण्याद्री., आंबेगाव तालुक्यातील भिमाशंकर, जुन्नर तालुक्यातील माळशेज घाट, भोर तालुक्यातील भाटघर धरण आणि गड-किल्ले परिसर. तर वेल्हा तालुक्यातील पानशेत धरण आणि परिसरात वर्षापर्यटनासाठी मोठी गर्दी होते. मुंबई, पुण्यासह बहुतांश जिल्ह्यातील पर्यटकांची पर्यटनासाठी या धरणांना पसंती असते. प्रत्येक विकएण्ड आणि सुट्टीच्या दिवशी मुंबई-पुण्यासह बहुतांश जिल्ह्यातील पर्यटकांची या ठिकाणी मोठी गर्दी उसळते. या धरण आणि इतर भागात नागरिकांच्या होणा-या गर्दीमुळे पाण्यात बुडून तसेच पुराच्या पाण्यात वाहून जाऊन मयत होणा-या व्यक्तींच्या संख्येत दरवर्षी वाढ होत आहे.  


हे ही वाचा :


Monsoon Travel : पावसाळ्यात लोणावळ्याला Weekend ट्रिपसाठी जाताय? 'या' गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागेल