पुणे : अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे (Maval Loksabha Election) आमदार दिलीप मोहिते पाटील (Dilip mohite Patil) इतके दिवस झोपा काढत होते का? असा प्रश्न शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी (jayant Patil) उपस्थित केला तर खासदार अमोल कोल्हेंनी (Amoll Kolhe) मोहिते किती लाचार झालेत?, अशी जहरी टीका केली. शिरूर लोकसभेत राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत होत आहे, अशात शरद पवारांवरून (Sharad Pawar) दोन्ही राष्ट्रवादीत खडाजंगी निर्माण झाली आहे.
मोहितेंनी कांद्याचे, दुधाचे दर कोसळण्याला थेट शरद पवारांना जबाबदार धरलं. शरद पवारांनी केंद्रीय कृषी मंत्री असताना एक कायदा केला असता तर आज शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू दिसले नसते, अशी टीका मोहितेंनी केली. या टीकेला जयंत पाटील आणि कोल्हेंनी प्रतिउत्तर दिलं. शरद पवारांनी केंद्रीय कृषी मंत्री असताना घेतलेल्या निर्णयामुळंच कृषी क्षेत्रात अमुलाग्र बदल झालेत. उलट पवारांनी कांदा निर्यात उठवली अन तुमच्या सरकारने निर्यात बंदी आणली. अशावेळी तुम्ही मांडलिकप्रमाणे बसून राहिले. दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींना हा प्रश्न विचारण्याऐवजी झोपा काढल्या, असा चिमटा जयंत पाटलांनी काढला. तर मोहिते सत्तेत जाण्यासाठी कसे लाचार झालेत आणि ते कसे महागद्दार आहेत. हे सांगताना कोल्हेनी गेल्या दहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शेतकरी विरोधी भूमिका कशा घेतल्या, याचा पाढा वाचला. शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून सध्या शिरूर लोकसभेत अशी खडाजंगी सुरु दिसत आहे.
जयंत पाटील नेमकं काय म्हणाले?
देशात कृषी खात्यामध्ये फार पुढे गेला आहे. देश निर्यातीपर्यंत पोहोचला आहे. कांदा निर्यात करायच्या वेळी निर्यात बंद करण्यात आली. असं तुमचं सरकार करत असेल तुम्ही झोपा काढत होता का?, असा सवाल जयंत पाटलांनी उपस्थित केला आहे. तुम्ही निर्यात बंदीला विरोध का नाही केला? तुम्ही एखादं स्टेटमेंट का नाही केलंय़ तुम्ही दिल्लीतल्या पंतप्रधानांना भेटून काहीच केलं नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
दिलीप मोहिते पाटील म्हणाले की, शरद पवार कृषीमंत्री होते तेव्हा त्यांनी एक कायदा केला असता तर आज शेतकऱ्यांची ही अवस्था झाली नसती. तम्ही कधीही लोकप्रतिनिधी म्हणून आमच्यासोबत बसून चर्चा केली नाही. आज ती चर्चा केली असतील तर शेतकरी चांगलाच सुखावला असता.
अमोल कोल्हें मोहिते पाटलांवर चांगलाच हल्लाबोल केला आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा आश्वासन देऊन भारतीय जनता पक्षाने त्याच्या ताटात माती कालवली त्याला गद्दारी म्हणतात.दरवर्षी दोन कोटी रोजगार देतो असं सांगून 83% सुशिक्षित बेरोजगारी या देशात केली त्याला गद्दारी म्हणतात, असंही ते म्हणाले.
इतर महत्वाची बातमी-