पुणे : अजित पवार (Ajit Pawar)  सत्तेशिवाय राहू शकत नाही, 2019 पासूनच सुरू भाजपसोबत (BJP) जाण्याचं प्लॅनिंग होतं ,  असे म्हणत रोहित पवारांनी जोरदार हल्लाबोल  केला आहे.  पुणे जिल्ह्यात हस्तक्षेप करायचा नाही असा त्यांचा  अलिखित नियम होता, असे देखील रोहित पवार (Rohit Pawar)  या वेळी म्हणाले. ते इंदापुरात बोलत होते.


रोहित पवार म्हणाले, अजित पवारांनी भाजप सोबत जाण्याचा निर्धार 2019 मध्ये केला होता.  हे मी नाही त्यांचे नातेवाईक सांगतात. मनात 2019 पासून साहेबांना सोडण्याचा प्लॅन करत होते. दादा सत्तेपासून दूर राहू शकत नाही. दादा आणि त्यांच्या सोबत गेलेले नेते सत्तेपासून दूर राहू शकत नाही. पुणे जिल्ह्यात हस्तक्षेप करायचा नाही असा अलिखित नियम होता, म्हणून आम्ही लक्ष देत नव्हतो.


भाजप नेते यांना धमक्या देतात, आम्ही फाईल बाहेर काढू: रोहित पवार


सोनाई डेअरीचे चेअरमन प्रवीण माने आणि शरद पवारांचे निकटवर्तीय प्रविण माने यांच्याविषयी बोलताना  रोहित पवार म्हणाले, प्रविण माने यांचा व्यवसाय आहे. शरद पवारांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रविण माने यांना मदत केली. त्यांना अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस धमकी देत असतील त्याला ते घाबरले. इथल्या लोकांनी निवडणूक ताब्यात घेतली आहे. सुप्रिया सुळे निवडून येणार आहे. सगळे नेते का गेले आहेत आपल्याला माहीत आहे. भाजप नेते यांना धमक्या देत आहेत की आम्ही फाईल बाहेर काढू म्हणून. मोहिते कुटुंबातील लोकांनी परत यायचा निर्णय घेतला.


केंद्रात सुप्रियाताईच निवडून जाणार सुनेत्रा काकी जाणार नाहीत: रोहित पवार


इंडिया आघाडीचे सरकार येणार आहे. तुम्ही कितीही बोला केंद्रात सुप्रियाताईच निवडून जाणार सुनेत्रा काकी जाणार नाहीत. अजित पवारांनी साहेबांना सोडलं त्यामुळे लोकांचा त्यांच्यावरती विश्वास नाही. साहेबांना सोडून तुम्ही भाजपसोबत गेलाय किती लोकांना आवडलं? असा सवाल देखील रोहित पवारांनी केला आहे. एका बाजूला तुम्ही म्हणता वातावरण भावनिक करू नका आणि तुम्हीच भावनिक करता, असे अजित पवार म्हणाले. 


शरद पवारांच्या मार्गदर्शनाखाली आईने फॉर्म घेतला :  रोहित पवार


बारामती लोकसभा निवडणुकीसाठी पुणे रोहित पवारांच्या आई सुनंदा पवार यांनी पुरक उमेदवारी अर्ज घेतला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून  पुरक अर्ज भरला जातो. लक्ष्मण खाबिया यांनी सुनंदा राजेंद्र पवार यांच्यासाठी अर्ज घेतला  यावर बोलताना रोहित पवार म्हणाले.  आईन साहेबांच्या मार्गदर्शनाखाली फार्म घेतला आहे तो घ्यावा लागतो.  माझी आई सुद्धा बाहेरून आली आहे. माझ्या आईला फॉर्म साहेबांनी घ्यायला लावला आहे, राजकीय दृष्टिकोनातून अजित दादा वेगळ्या दृष्टिकोनाचे झालेत. आम्ही कुटुंब म्हणून त्या ठिकाणी काम करतो. दादा स्वतः एक ते दूर गेले. ही विचाराची लढाई आहे 


महायुतीत आदेश येतात त्यांच्याकडे हुकूमशाही :  रोहित पवार


आगामी निवडणुकांविषयी बोलताना रोहित पवार म्हणाले, आम्ही 35 ठिकाणी निवडून येऊ असं म्हणतो आहे.  48 ठिकाणी निवडून येऊ असं म्हणालो नाही आम्ही चर्चेने मार्ग काढतो परंतु महायुतीत आदेश येतात त्यांच्याकडे हुकूमशाही आहे. 


हे ही वाचा :


Baramati Lok sabha: बारामतीत अजित पवार डमी उमेदवार म्हणून अर्ज दाखल करण्याची शक्यता