पुणे : निवडणूक आयोगाकडून (Election Commission) लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election Dates) तारखा जाहीर करण्यात आल्या. त्यात पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रातील एकूण 10 मतदार संघाच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. सांगली लोकसभा मतदारसंघ (sangali Lok Sabha Constituency) , कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ (Kolhapur Lok Sabha Constituency), म्हाडा लोकसभा मतदारसंघ (Mhada Lok Sabha Constituency), मावळ लोकसभा मतदारसंघ (Maval Lok Sabha Constituency), शिरुर लोकसभा मतदारसंघ (Shirur Lok Sabha Constituency), हातकणंगले लोकसभा मतदारसंघ (Hatkanagle Lok Sabha Constituency) , पुणे लोकसभा मतदारसंघ (Pune Lok Sabha Constituency) , बारामती लोकसभा मतदारसंघ ( Pune Lok Sabha Constituency), सोलापूर लोकसभा मतदारसंघ, सातारा लोकसभा मतदारसंघांचा (Satara Constituency), समावेश आहे.
कोणत्या मतदारसंघात मतदान कधी होणार?
7 मे 2024 : बारामती, सोलापूर, सांगली, म्हाडा, कोल्हापूर, हातकणंगले, सातारा
13 मे 2024 : पुणे, मावळ, शिरुर
मतमोजणी कधी होणार?
चार जूनला मतमोजणी होणार आहे.
दहापैकी पुणे, सांगली आणि माढा लोकसभा मतदार संघाचे भाजपचे उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. मात्र उरलेल्या ठिकाणी महायुती आणि महाविकास आघाडी देखील अद्याप त्यांच्या उमेदवारांची निवड जाहीर करू शकले नाहीत. पश्चिम महाराष्ट्रात सांगली , कोल्हापूर, म्हाडा, मावळ , शिरुर , हातकणंगले , पुणे, बारामती, सोलापूर , सातारा उमेदवार घोषित व्हायचे आहेत.
बारामतीत पश्चिम महाराष्ट्रात सगळ्यात महत्वाची लढत
पश्चिम महाराष्ट्रात सगळ्यात महत्वाची लढत बारामतीत होणार आहे. त्यात पवार विरुद्ध पवार लढत बघायला मिळण्याची शक्यता आहे. त्यातच बारामतीत सुप्रिया सुळेंची तर उमेदवारी शरद पवार यांनी घोषित केली आहे मात्र अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार या उभ्या राहणार असल्याचं जरी सर्वांना ठाऊक असलं तरी अधिकृत घोषणा होणं बाकी आहे. यातच महत्वाचं म्हणजे विजय शिवतारे यांनी अपक्ष लढणार असल्याचं सांगितल्यामुळे लढत अजून कठिण होण्याची शक्यता आहे. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून त्यांनी समजून काढण्याचे प्रयत्न सुरु आहे.
इंडिया वोटर्स या बेवसाईटच्या आकडेवारीनुसार मतादारांची संख्या खालीलप्रमाणे...
बारामती : 20,25,795
मावळ : 21,75,681
पुणे :19,97,594
सांगली : 14,24,936
सातारा : 17,53,567
कोल्हापूर : 18,05,949
शिरुर : 20,45,438
सोलापूर : 17,47,242
म्हाडा : 18,25,200
हातकणंगले : 16,93,449
महाराष्ट्रात कोणत्या मतदारसंघात कधी मतदान?
पहिला टप्पा : मतदान- 19 एप्रिल : रामटेक, नागपूर, भंडारा -गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर (विदर्भातील 5)
दुसरा टप्पा : मतदान- 26 एप्रिल : बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी (एकूण मतदारसंघ - 8)
तिसरा टप्पा : मतदान- 7 मे : रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले (एकूण मतदारसंघ - 11 )
चौथा टप्पा : 13 मे : नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड (एकूण मतदारसंघ - 11 )
पाचवा टप्पा : 20 मे : धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य, आणि दक्षिण मुंबई (एकूण मतदारसंघ - 13 )