Pune University : पुणे हे विद्येचं माहेरघर म्हटलं जातं. महाराष्ट्रातील अनेक शहरांच्या तुलनेत पुणे शहरात उच्च प्रतिचं शिक्षण दिलं जातं. त्यामुळेच संपूर्ण महाराष्ट्रातून तरुण-तरुणी पुण्यात शिक्षणासाठी येतात. मात्र याच पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठातील एक धक्कादायक प्रकार समोर येत आहे. येथील मुलींच्या वसतीगृहात मुलींकडून मोठ्या प्रमाणात मद्यप्राशन आणि धूम्रपान केलं जात असल्याचं समोर आलंय. 


विद्यार्थिनीनेच समोर आणला गंभीर प्रकार


मिळालेल्या माहितीनुसार पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठामधील मुलींच्या वस्तीगृहात मुलींकडून मोठ्या प्रमाणात मद्यप्राशन आणि धूम्रपान करत आहेत. याबाबतचे काही फोटो आणि व्हिडिओ काढून एका वस्तीगृहातील मुलीने हा प्रकार उघडकीस आणला आहे. वसतिगृहात राहात असलेल्या एका विद्यार्थिनीनेच या सर्व गैरप्रकारची माहिती वसतिगृह महिला अधिकारी यांच्याकडे वारंवार केली होती. परंतु संबंधित अधिकाऱ्यांनी कोणती कारवाई केली नाही. त्यानंतर संबंधित विद्यार्थिनीने प्रभारी कुलसचिव आणि कुलगुरू यांना पत्र लिहून हा सर्व घटनाक्रम सांगितला आहे.


प्रशासनाकडून कोणतीही कारवाई नाही


याच तरुणीने मद्यप्राशन आणि धुम्रपान करणाऱ्या वस्तीगृहातील मुलींवर कोणतीही कारवाई केली जात नाहीये, असा आरोप केला आहे. विशेष म्हणजे तक्रार करूनही वसतीगृहाच्या प्रशासनाने कोणतेही पाऊल उचललेले नाहीये, असा आरोप पीडित तरुणीने केला आहे. त्यामुळे पुणे सावित्रीबाई फुले विद्यापीठात नेमकं चाललंय तरी काय? असा सवाल उपस्थित केला जातोय. 


...तर आंदोलन केलं जाईल


दरम्यान, अशा कथित प्रकारावर योग्य ती कारवाई न केल्यास तसेच विद्यापीठाचा परिसर नशामुक्त होण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाने उपाययोजना कराव्यात अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने दिला आहे. त्यामुळे आता नेमके काय होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.



हेही वाचा :


बंद कंटेनरला कारची जोरदार धडक, 2 महिलांचा जागीच मृत्यू, पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात 


स्वारगेटमधील घटना ताजी असतानाच पुणे ते सांगली शिवशाही बसमधून रात्री प्रवास करणाऱ्या तरुणीचा अश्लील चाळे करत विनयभंग


Pune Crime News: अश्लील कृत्य करणारा तरूण कोण? कुठे गेला? कोणते गुन्हे दाखल केले? पुणे पोलिसांनी दिली A टू Z माहिती