पुणे : पुण्याच्या प्रसिद्ध लक्ष्मी रोडवर वाहनांवर बंदी घालण्याचा महापालिकेचा विचार आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही माहिती दिली. दीडशे वर्ष जुन्या बंडगार्डन पुलावर कायमस्वरुपी वॉकिंग प्लाझाचं उद्घाटन करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते.
लक्ष्मी रोड हा पुण्यातला मध्यवर्ती रोड आहे. सध्या या रस्त्यावर अलका टॉकिजच्या दिशेने एकेरी वाहतूक आहे. मात्र शॉपिंगसाठी या रस्त्यावर गर्दी होत असल्यानं लक्ष्मी रस्त्यावर वाहनांवर बंदी घालण्याचा पालिकेचा विचार आहे.
लक्ष्मी रोडसोबतच औंधचा डीपी रोडसुद्धा वॉकिंग प्लाझा करण्यासंदर्भात महापालिकेचा विचार असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं. तसेच व्यापाऱ्यांचा विरोध झाला तरी 90 टक्के नागरिकांसाठी महत्त्वाचा असलेला निर्णय घेऊ, असंही त्यांनी म्हटलं.