मुंबई-गोवा हायवेवर भीषण अपघात, 6 प्रवाशांचा मृत्यू
एबीपी माझा वेब टीम | 15 May 2016 03:30 AM (IST)
इंदापूर (रायगड) : मुंबई-गोवा हायवेवर भीषण अपघात झाला आहे. रायगडमधील इंदापूरजवळ हा अपघात झाला असून, या भीषण अपघातात 6 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. शिवनेरी एसटी बस आणि वॅगन आर कारचा अपघात पहाटे 5 च्या सुमारास झाल्याची माहिती मिळते आहे. या अपघातात 6 जणांचा मृत्यू, तर एक जण जखमी झाला आहे. मुंबईहून कोकणात जाणाऱ्या कारने शिवनेरी एसटीला ओव्हरटेक करताना हा भीषण अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे.