Laxman Jagtap Passed Away: पिंपरी-चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप (Lakshman Jagtap) यांचं दीर्घ आजारामुळे निधन झालं आहे. त्यांनी वयाच्या 59 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने धडाडीचा आणि लोकप्रिय आमदार गमावल्याच्या प्रतिक्रिया राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे. शेतकरी पुत्र ते लोकप्रिय आमदार असा त्यांचा प्रवास आहे. त्यासोबतच त्याचा राजकीय प्रवासही शिस्तबद्ध आणि धडाडीचा राहिला आहे. 


पिंपरी-चिंचवडमधील पिंपळे गुरवमध्ये एका शेतकरी घरात 15 फेब्रुवारी 1963 मध्ये लक्ष्मण जगताप यांचा जन्म झाला. पिंपळे गुरव या परिसरातून त्यांनी राजकीय जीवनात प्रवेश घेतला. नगरसेवक, स्थायी समिती सभापती, महापौर, विधान परिषद सदस्य, विधानसभा आमदार असा त्यांचा राजकीय प्रवास आहे. या सगळ्या प्रवासात अनेकदा त्यांना नकार सोसावे लागले. मात्र ते हटले नाही. स्वत:च्या जोरावर कोणताही राजकीय पाठिंबा नसताना त्यांनी पुण्याच्या राजकारणात लोकप्रिय नेता म्हणून आपलं नाव कोरलं. आज त्यांच्या निधनाने पुण्यानेच नाही तर महाराष्ट्राने मेहनती आणि कष्टाळू आमदार गमावला. 


नगरसेवक ते लोकप्रिय आमदार...



  • कॉंग्रेस पक्षातून लक्ष्मण जगताप यांच्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात झाली.

  • 1992 मध्ये ते पहिल्यांदाच नगरसेवक म्हणून निवडून आले होते. त्यानंतर 1997 मध्येही त्यांनी नगरसेवक पद हलू दिलं नाही.

  • एक दोन नाही तर तब्बल 10 वर्ष त्यांनी पिंपळे गुरवचं प्रतिनिधित्व केलं.

  • त्यानंतर ते पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेचे स्थायी समिती सभापतीपद भूषवलं.

  • सध्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि लक्ष्मण जगताप यांची चांगली ओळख होती.

  • त्यावेळी उत्तम, हुशार, मेहनही आणि निष्ठावान कार्यकर्ते म्हणून जगताप यांची ओळख होती. लक्ष्मण जगताप हे शरद पवारांचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणूनही ओळखू जाऊ लागले.

  • 1998 मध्ये अस्तित्वात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांनी प्रवेश केला. त्यानंंतर 2000 ते 2002 ते पुण्याचे महापौर राहिले. 


बंडखोरी का केली?


महापौर पद भूषवल्यानंतर लक्ष्मण जगताप यांचा विकास बोलत होता. शहराचा केलेल्या विकासामुळे अनेकांमध्ये ते लोकप्रिय होते. 2003-04 मध्ये विधानपरिषदेच्या निवडणुका लागल्या होत्या. त्यावेळी त्यांनी निवडणुकीसाठी स्थानिक स्वराज्य संस्था गटातून राष्ट्रवादी पक्षाकडे उमेदवारी मागितली होती. मात्र पक्षाने या निष्ठावान नेत्याची उमेदवारी नाकारली आणि त्यामुळे त्यांनी बंडखोरी केली. 


विधानपरिषदेची निवडणूक अपक्ष लढवली अन् शेकापमध्ये प्रवेश घेतला


2003-04 मध्ये विधान परिषदेची निवडणूक त्यांनी अपक्ष लढवली होती. त्यावेळी राजकीय ताकद दाखवली होती. त्यानंतर 2014 ला लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने उमेदवारी नाकारली. त्यानंतर त्यांनी शेतकरी कामगार पक्षात प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला. मात्र यावेळी त्यांचा पराभव झाला. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला. विधानसभेच्या निवडणुकीत त्यांना भाजापकडून उमेदवारी देण्यात आली आणि त्यांनी भाजपकडून विजय मिळवला आणि विधानसभेत निवडून गेले. 


भाजपचे निष्ठावान आमदार


10 जून 2022 रोजी झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीच्या मतदानासाठी भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप अॅम्ब्युलन्समधून मुंबईत आले होते. अनेक महिन्यांपासून आजारी असलेल्या लक्ष्मण जगताप यांना 2 जून 2022 रोजी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला होता. त्यानंतर 10 जून रोजी राज्यसभेची निवडणूक होती. आपल्या एकाही आमदारांचं मत कमी पडू नये यासाठी राजकीय पक्ष प्रयत्न करत होते. त्यातच पक्षाने आग्रह केल्याने लक्ष्मण जगताप मतदानासाठी रस्तेमार्गाने अॅम्ब्युलन्समधून पिंपरी चिंचवडहून मुंबईला मतदानासाठी आले होते.


संबंधित बातम्या-


Laxman Jagtap Passed Away : पिंपरी-चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचं निधन; कर्करोगाशी झुंज अखेर अपयशी