पुणे : ललित पाटील (Lalit Patil)  प्रकरणात दोषी आढळलेल्या ससून हॉस्पिटलचे (Sasoon Hospital) डीन डॉक्टर संजीव ठाकूर (Sanjeev Thakur)  यांना पदमुकक्त करुन त्यांच्या विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहे. तर आर्थोपेडीक सर्जन डॉक्टर प्रविण देवकाते चौकशी यांच निलंबन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र मॅटचा निकाल विरोधात गेल्याने डॉक्टर संजीव ठाकूर पदमुक्त होणार हे स्पष्ट झालेल असताना त्यांना पुन्हा पदमुक्त करण्याचा मंत्री हसन मुश्रीफ यांचा आदेश म्हणजे धुळफेक असल्याच विरोधकांनी म्हटले आहे. चौकशी समितीला दोषी आढळलेल्या या दोन्ही डॉक्टरांवर पोलीस काय कारवाई करतात याकडे सगळ्यांच लक्ष असणार आहे.


ड्रग माफिया ललित पाटीलला मदत केल्याचा ज्यांचावर आरोप होत होता ते ससून रुग्णालयाचे डीन डॉक्टर संजीव ठाकूर यांना या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या चार सदस्यीय वैद्यकीय समितीनं दोषी ठरवलय. या समितीच्या अहवालानुसार  ललित पाटीलचा ससून रुग्णालयातील मुक्काम वाढावा यासाठी त्याला डॉक्टर ठाकूर यांची मदत होत होती.   डॉक्टर ठाकूर यांच्या सांगण्यावरून डॉक्टर प्रवीण देवकाते हे ललित पाटील आजारी असल्याचे खोटे रिपोर्ट तयार करत होते. या दोन्ही डॉक्टरांचे हे कृत्य वैद्यकीय करताना डॉक्टर घेत असलेल्या शपथेला आणि वैद्यकीय व्यवसायाला अनुसरून नव्हते. 


डॉक्टर संजीव ठाकूर ससून रुग्णालयाचे डीन दहा महिन्यांपूर्वी रुजू झाले. ललित पाटील ससून रुग्णालयात डिसेंबर 2020 पासून ठाण मांडून होता. त्यामुळे डॉक्टर ठाकूर यांच्या आधीच डीन आणि अधिकार्‍यांची चौकशी होण्याची गरज आहे. मात्र डीन डॉक्टर संजीव ठाकूर यांच्यावरची ही कारवाई म्हणजे धूळफेक असल्याच आमदार रवींद्र धंगेकर आणि शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे.  कारण ससूनच्या डीन पदी डॉक्टर ठाकूर यांची नियुक्ती करण्यासाठी ससुनचे आधीचे डीन डॉक्टर विनायक काळे यांची मुदती आधी बदली करण्यात आली होती. या निर्णयाच्या विरोधात डॉक्टर काळे यांनी मॅटमधे दाद मागितली होती.  मॅटने शुक्रवारी डॉक्टर विनायक काळे यांच्या बाजूने निकाल देताना डॉक्टर संजीव ठाकूर यांना तात्काळ पदमुक्त करण्याचे आदेश दिले . त्यानंतर थोड्याच वेळात  वैद्यकीय शिक्षण विभागाने डॉक्टर ठाकूर यांना पदमुक्त करण्याचे आदेश दिले. 


ललित पाटील आणि त्याच्या टोळीवर मोक्का कायदा लावण्यात आलाय. या टोळीमधे ससुनमधील या दोन डॉक्टरांचाही समावेश करावा अशी मागणी विरोधकांनी केलीय.  या दोन डॉक्टरांनी ललित पाटीलचा रुग्णालयातील मुक्काम वाढावा यासाठी तर प्रयत्न केलेच. मात्र त्याच्या ड्रग विक्रीच्या रॅकेट मधे ते प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभागी होते का याच उत्तर पुणे पोलीसांना द्यायच. ललित पाटीलवर एकुण सहा डॉक्टर उपचार करत होते. या सहापैकी चारच डॉक्टरांची नावे आतापर्यंत समोर आलियत. इतर चार डॉक्टरांचा नेमका काय रोल होता हे या अहवालात समजु शकलेल नाही. त्यामुळे या अहवालानंतर देखील अनेक प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत.