पुणे : ललित पाटील ड्रग्स प्रकरणात सध्या (Lalit Patil Drug Case) ससून रुग्णालयातील वॉर्ड नंबर 16 मधील क्लार्क आणि नर्स यांची चौकशी करण्यात येत आहे. पुणे पोलिसांकडून ही चौकशी करण्यात येत आहे. ललित पाटीलचा ससून रुग्णालयातील मुक्काम वाढवण्यात हे क्लार्क आणि नर्स प्रयत्नशील होते का?, त्यांनी ललिच पाटीलला कोणत्या प्रकारची मदत केली आहे का? याची सध्या चौकशी करण्यात येत आहे.
पुणे पोलिसांचा रोख हा ससून रुग्णालयाच्या व्यवस्थापनावर केंद्रीत झाला आहे. ललित पाटीलच्या मुक्कामासाठी नक्की कोण प्रयत्न करत होते? आणि ललित पाटीलला ससूनमधून पळून जाण्यासाठी कोणी मदत केली? ही माहिती घेण्यासाठी पुणे पोलिसांनी आता कंबर कसली आहे. त्यामुळे ही चौकशी करण्यात येत आहे. या प्रकरणात ससूनमध्ये काम करणाऱ्या क्लार्क महेंद्र शिवटे यांचं नाव सातत्याने समोर येत आहे. शिवटे हे कैद्यांना कुठे आणि किती दिवस ठेवायचं यात सहभागी असतात त्यामुळे त्यांच्यावर संशय व्यक्त केला जात आहे.
सगळ्या डॉक्टरांची चौकशी होणार...
या प्रकरणात आतापर्यंत अनेकांची चौकशी करण्यात आली आहे. त्या चौकशीत ससूनचे डीन संजीव ठाकूर हे दोषी आढळल्याने त्यांना पदमुक्त करण्यात आलं आहे तर डॉ. देवकाते आहे त्यांंचं निलंबन करण्यात आलं आहे. आता क्लार्क आणि नर्सेसची चौकशी करण्यात येत आहे. मात्र ही चौकशी इथेच थांबणार नसून वॉर्ड नंबर 16 मध्ये कार्यरत असलेल्या सगळ्याच डॉक्टरांची चौकशी होणार आहे. ससूनचा X-Ray विभागातील सगळ्यांची चौकशी होणार आहे. X-Ray काढण्यासाठी 2 ऑक्टोबरला ललित पाटीलला 16नंबर वॉर्डमधून बाहेर काढण्यात आलं होतं आणि त्याचदरम्यान तो पळाला होता. त्यामुळे X-Ray विभागातील सगळ्यांची कसून चौकशी करण्यात येणार आहे.
ससून रुग्णालयाला ललित पाटीलची धास्ती?
ड्रग्स माफिया ललित पाटील याला दाखल करण्यास आता ससून रुग्णालयाचा नकार देत आहे. ड्रग्स तस्कर ललित पाटील याला ससून रुग्णालय प्रशासन आता दाखल करून घ्यायला तयार नाहीत.ललित पाटील ससून रुग्णालयातून पळून गेल्यानंतर डॉक्टर आणि पोलिसांवर संशय होता. त्यानंतर या दोघांनीही ललित पाटीलला मदत केल्याचं पुढे आलं. त्यानंतर अनेक जणांवर संशय व्यक्त करण्यात आला. या प्रकरणी दोन पोलिसांना बडतर्फ करण्यात आलं. ससून रुग्णालयातील डीन संजीव ठाकूर यांना पदमुक्त करण्यात आलं आणि डॉ. देवकाते यांना निलंबित करण्यात आलं. या सगळ्या प्रकरणानंतर आता ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी धास्ती घेतली आहे. त्यामुळे त्याला रुग्णालयात भर्ती करुन घेत नाही आहे. त्याच्यावर उपचार करुन त्याला परत पाठवण्यात येत आहे.
इतर महत्वाची बातमी-