पुणे : ड्रग्ज माफिया ललित पाटील याचा ताबा आता पुणे पोलीस मागण्याच्या (Sasoon Hospital Drug Racket) तयारीत आहे. ललित पाटीलची कोठडी मिळावी यासाठी पुणे पोलीस कोर्टात मागणी करणार आहेत. मुंबई पोलिसांकडील पोलीस कोठडी आज संपणार आहे. जर मुंबई पोलिसांनी वाढीव कोठडी मागितली नाही तर पुणे पोलीस ललित पाटीलची कोठडी मागण्याची शक्यता आहे.
पुणे पोलिसांचा तपास हा ललित पाटीलच्या चौकशीपर्यंत येऊन थांबला आहे. आतापर्यंत ललित पाटील प्रकरणात पुणे पोलिसांनी काहींना अटक केली आहे आणि त्यासोबतच ससूनचादेखील तपास सुरु आहे. मात्र हा तपास पुढे नेण्यासाठी ललित पाटीलचा ताबा पुणे पोलिसांना मिळणं गरजेचं आहे.ललित पाटीलला कोण मदत करत होतं? या प्रकरणात नेमका कोणाकोणाचा समावेश होता. या संदर्भातील सगळी माहिती पुढे येणं गरजेचं आहे. त्यामुळे ललित पाटीलचा ताबा मिळवण्यासाठी पुणे पोलीस प्रयत्न करत आहे.
मकोका लावण्याच्या तयारीत..
ललित पाटील आणि त्याच्या साथीदारांवर पुणे, मुंबई, नाशिक आणि चाकण या चार शहरांमध्ये गुन्हे दाखल आहेत. ड्रग्ज विक्रिसाठीच हे गुन्हे नोंद आहेत या सगळ्या प्रकरणात ललित पाटील याला त्याच्या साथीदाराने मोठी मदत केली आहे. त्यामुळे ललित पाटील आणि त्याच्या साथीदारांवर संघटीत गुन्हेगारीच्या अंतर्गत कारवाई करण्याचा विचार पुणे पोलिसांकडून केला जात आहे. सोबतच पुणे पोलिसांकडून ही कारवाई करण्याची तयारीदेखील सुरु झाली आहे.
सगळ्यांची सखोल चौकशी सुरु
ललित पाटील प्रकरणात आतापर्यंत ललित पाटील, भुषण पाटील, अभिषेक बलकवडे, अरविंद लोहारे, दत्ता डोके, विनय अऱ्हाना, अमीर आतिक शेख, प्रज्ञा कांबळे, अर्चना निकम यांना पोलिसांनी विविध ठिकाणाहून ताब्यात घेतलं आहे. या सगळ्यांचा ड्रग्ज रॅकेटमध्ये सहभाग असल्याचं समोर आलं आहे. त्यात ललित पाटीलला अरविंद लोहारे याने मेफेड्रॉन बनवण्याचे धडे दिल्याचंदेखील समोर आलं होतं. त्यात आता ससूनचे डीन संजीव ठाकूर ललितला ससूनमध्ये आश्रय देत असल्याची माहिती समोर आली आहे.
कोणालाही अटक का नाही झाली?
ललित पाटील प्रकरणात आतापर्यंत अनेकांना अटक होणं अपेक्षित होतं मात्र आतापर्यंत कोणालाही अटक करण्यात आली नाही. सुरुवातील प्रकरण समोर येताच ससूनचे डीन संजीव ठाकूर यांना अटक करायला हवी होती. मात्र या प्रकरणात फक्त चौकशीचा फार्स सुरु आहे. योग्य कारवाई होताना दिसत नसल्याचं आमदार रविंद्र धंगेकर म्हणाले आहे. सगळ्यांच्या कृत्यावर पांघरुण टाकण्याचं काम सरकार करत असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.
इतर महत्वाची बातमी-