पुणे : पुण्यातील ससूनचे कैदी रुग्ण समितीच्या अध्याक्षांनी (Sasoon Hospital Drug Racket)राजीनामा दिला आहे. ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात संशयाच्या भोवऱ्यात आढळल्याने त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. डॉ. सुधीर धिवारे असं या कैदी रुग्ण अध्याक्षांचं नाव आहे. 27 ऑक्टोबरला त्यांनी  कैदी रुग्ण अध्याक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. मात्र सध्या ससूनमध्य़े सुरु असलेल्या प्रकार आणि ललित पाटील ड्रग्ज प्रकरणाशी त्यांचा काहीही संबंध नाही. मात्र उगाच त्यांना या प्रकरणात ओढण्याचा प्रयत्न सुरु असल्याने त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. 

Continues below advertisement

कैदी रुग्ण समिती नेमकी काय करते?

ससून रुग्णालयात वॉर्ड नं. 16 मध्ये कैदी रुग्णांवर उपचार करण्यात येतात. या वॉर्डमध्ये येरवडा कारागृहातील रुग्ण उपचार घेत असतात. यात कैदी रुग्णांवर कोणते उपचार करायाचे याचे सगळे निर्णय ही समिती घेत असते आणि त्यांना किती दिवस रुग्णालयात ठेवायचं याचा निर्णयदेखील हिच समिती घेत असते. मात्र ललित पाटील प्रकरणासंदर्भात आता नवी माहिती हाती येत आहे. ललित पाटीलसंदर्भात सगळे निर्णय ही समिती घेत नसून ससून रुग्णालय़ाचे डीन डॉ. संजीव ठाकूर आणि त्यांच्यापूर्वीचे ससूनचे डीन घेत असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे या सगळ्या प्रकाराला कंटाळून धिवारे यांनी राजीनामा दिला आहे. 

धीवारे यांचा ललित पाटील प्रकरणाशी काहीही संबंध नाही...

2 ऑक्टोबरला ललित पाटीलने पलायन केलं होतं. मात्र त्याच्या काहीच दिवस आधी म्हणजेच 27 सप्टेंबरला धिवारे यांनी अध्यक्षपद स्विकारलं होतं. मात्र त्यानंतर त्यांंचा या ललित पाटील प्रकरणाशी कोणताही संबंध नसताना त्यांना या प्रकरणात ओढावण्याचा प्रयत्न केला जात आहे. शिवाय ललित पाटीलला मदत केल्याचा कोणताही पुरावा किंवा चौकशीतून समोर आलं नाही आहे. मात्र या सगळ्या प्रकरणाची जबाबदारी त्यांनी स्वत: कडे घ्यावी असा ससूनच्या व्यवस्थापनातून त्यांच्यावर दबाव टाकण्यात येत होता. या सगळ्याला कंटाळून त्यांनी राजीनामा दिला आहे. 

Continues below advertisement

ललितला टीबी झाल्याचं ससूनच्या डीनचं पत्र

ललित पाटीलचा ससून रुग्णालयातील मुक्काम वाढावा यासाठी त्याला वेगवेगळे आजार असल्याच कागदोपत्री दाखवण्यात येत होतं. ससून रुग्णालयात भरती असलेल्या ललित पाटीलची माहिती घेण्यासाठी येरवडा कारागृहाकडून विचारणा झाल्यानंतर डॉक्टर संजीव ठाकूर यांनी ललित पाटीलला टी. बी. झाल्याच उत्तर या पत्रात दिलंय. ललित पाटीलला तीन वर्षांच्या कालावधीत अनेक आजार झाल्याचं ससून रुग्णालयाने दाखवले आहे. या पत्रावर सुधीर धिवारे यांचीदेखील सही आहे. 

इतर महत्वाची बातमी-

ससूनचे डीन ललित पाटीलवर मेहरबान असल्याचा आणखी एक पुरावा समोर, ललितला टीबी झाल्याचं ससूनच्या डीनचं पत्र एबीपी माझाच्या हाती