पुण्यातील कोरेगाव भीमामध्ये 206 वा शौर्य दिनाचा उत्साह, अभिवादनासाठी भीम अनुयायांची गर्दी

Koregaon Bhima : शौर्य दिनानिमित्त (Shaurya Din) कोरेगाव भीमा (Koregaon Bhima) इथे विजय स्तंभास अभिवादन करण्यासाठी नागरिकांना मोठी गर्दी केली आहे

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 01 Jan 2024 07:41 AM
Koregaon Bhima: कोरेगाव भीमा येथे येणाऱ्या सर्व अनुयायांनी शांततेत दर्शन घ्यावे : अजित पवार

Ajit Pawar: कोरेगाव भीमा येथे येणाऱ्या सर्व अनुयायांनी शांततेत दर्शन घ्यावे. शांततेत शौर्यस्तंभास अभिवादन करावे. हा कार्यक्रम सुरळीत पार पडावा यासाठी प्रशासनाने संपूर्ण तयारी केली आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. 

पार्श्वभूमी

Koregaon Bhima Live Updates : कोरेगाव भीमा या ठिकाणी आज 206 वा शौर्य दिन साजरा होत आहे. शौर्य दिनाच्या (Shaurya Din) पार्श्वभूमीवर कोरेगाव भीमा (Koregaon Bhima)  विजय स्तंभास अभिवादन करण्यासाठी नागरिकांना मोठी गर्दी केली आहे.उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सकाळी विजय स्तंभाला अभिवादन केले. आज दिवसभरात लाखो आंबेडकर अनुयायी या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी येणार आहेत. मंत्री चंद्रकांत पाटील (Minister Chandrakant Patil), प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar), केंद्रीय मंत्री रामदास आठवले, आमदार जितेंद्र आव्हाड हे नेतेही कोरेगाव भीमा या ठिकाणी येणार आहेत. 1818 मध्ये पेशवाईचा अस्त झालेल्या कोरेगावच्या लढाईचा दिवस अनुयायांकडून शौर्य दिन म्हणून साजरा केला जातो. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.