पुणे: शिरूरचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांचा पराभव करणं सोपं नाही, अमोल कोल्हे यांनी लोकसभेत सर्वाधिक प्रभावी पद्धतीने प्रश्नांची मांडणी केली आहे असं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी म्हटलं. अमोल कोल्हे यांना त्यांच्या लोकसभा मतदारसंघात अधिक प्रोत्साहन द्याल असा मला विश्वास आहे. काहींनी अमोल कोल्हे यांना आव्हान दिलं, तुम्ही आव्हान देता पण यात दुरुस्ती व्हायला हवी अशी अपेक्षा आहे असंही ते म्हणाले. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या शेतकरी आक्रोश मोर्चामध्ये बोलत होते. 


जयंत पाटील म्हणाले की, "आज काही लोकं अमोल कोल्हे यांना पराभव करायचा प्रयत्न करत आहेत. ज्या व्यक्तीने शिवाजी महाराजांना घरापर्यंत पोहचवले त्यांना पराभूत करणे सोपे नाही. संभाजी महाराज, शिवाजी महाराज यांची खरी ओळख कोल्हेंनी जनतेला करून दिली. तसेच आण्णाजी पंत कोण आहे याची ओळख करण्याचे कामही त्यांनी केलं. अमोल कोल्हे तुम्ही या लोकसभा मतदारसंघांमध्ये फिरा, पण मला तुम्हाला महाराष्ट्रात घेऊन फिरायचे आहे. शिवस्वराज्य यात्रेची कल्पना मी अमोल कोल्हे यांना दिली होती, तेव्हा अमोल मिटकरी देखील आमच्या बरोबर असायचे. त्यावेळी आम्ही 54 आमदार निवडून आणले."


काय म्हणाले जयंत पाटील?


अमोल कोल्हे यांचे अभिनंदन यासाठी की देशातील आणि राज्यातील अनेक खासदार कदाचित वेगळे प्रश्न मांडत असतील, पण सगळ्यात प्रभावी मांडणी कोणी लोकसभेत केली असेल तर अमोल कोल्हे यांनी केलं. नुसतं युट्यूबवर अमोल कोल्हे आणि त्यांची लोकसभेतील भाषण ऐका मग समजेल. अमोल कोल्हे हा मोर्चा घेऊन सगळ्यांच्या समोर अनेक प्रश्न घेऊन आले आहेत. मला वाटलं होतं की संसदेतील खासदार असा शेतकरी आक्रोश मोर्चा काढतोय की राज्यातील नेत्यांनी त्यांची दखल घ्यावी.


दिलीप मोहिते असं कसं केले तुम्ही? 


या मोर्चेला कमी लेखण्याचा काम करण्यापेक्षा आम्ही सगळ्या प्रश्नांना न्याय देऊ असे सांगायला पाहिजे होते. आज मला खंत वाटते की दिलीप मोहिते यांनी आमचे व्यासपीठ सोडले आहे आणि मला मनापासून दुःख वाटतं. माणसाच्या आयुष्यात काही प्रसंग येत असतात की ठामपणे भूमिका घेऊ शकतो. कसं काय राव कसं केलं तुम्ही? 


मी काही लोकांना विचारलं तर लोकं म्हणतात सध्या सगळीकडे दहशत आहे. शिवसेना, काँग्रेस आणि पवार साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत परत येईल असे तरुण म्हणतात. सी व्होटरने सर्व्हे केला आहे, महाविकास आघाडीचा आकडा सध्या 29 आहे. ज्यावेळी वज्रमूठ सभा सुरू होतील आणि जेव्हा आमचे नेते सभेसाठी एकत्र येतील तेव्हा महाराष्ट्र ढवळून निघेल आणि जनमत काय आहे ते स्पष्ट होईल. 


दिल्लीच्या तख्तासमोर झुकायचं नाही


कुठल्या ही नेत्याला कांदा निर्यातीसंदर्भात बोलता येत नाही. पण आपण दिल्लीच्या तक्तासमोर झुकायचे नाही. शरद पवार आक्रमकतेने नाहीतर सौम्यातेने सगळ्या गोष्टी करत आहेत. हळूहळू या सगळ्या परिस्थितीवर मात करण्याची मानसिकता 84 वर्षाच्या व्यक्तीत दिसते. एकसंघाने दोन्ही निवडणुका झाल्या तर मोठ्या प्रमाणात आपण निवडणुका जिंकू. पवार साहेबांच्या, उद्धव ठाकरे आणि इंडियाच्या मागे उभे रहा. 


बाबरी मशीदीच्या पतनावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी जबाबदारी घेतली होती, पण भाजपमधील कोणी पुढे आलं नव्हतं. बाळासाहेब यांचे चिरंजीव म्हणून उद्धव ठाकरे यांना अयोध्येत बोलवायला हवे होते. त्यांना निमंत्रणच नाही हे किती दुर्दैवी आहे. 
जानेवारी महिना हा रामाचा महिना म्हणून सोडून द्या


रामाचे गुण हे सगळे पाळण्याचं काम आमची महाविकास आघाडी करेल. राम हा भारत भूमीचा देव आहे. सगळ्यांना आता अक्षता देण्यात येतील. कलश यात्रा ही राजकीय नसावी. जानेवारी हा महिना रामाचा महिना म्हणून तुम्ही सोडून द्या. कारण सत्तेतील लोकांना प्रश्न विचारले तर ते या महिन्यात सोडविणार नाहीत. रामाला कब्जात घेण्यासाठी सरकार जानेवारी महिन्यात सुट्टीवर गेले आहे.


ही बातमी वाचा: