Jalyukt Shivar Abhiyaan : जलयुक्त शिवार (Jalyukt Shivar) हा राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे.  शिंदे-फडणवीस सरकारनं 'जलयुक्त शिवार अभियान 2.0' (Jalyukt Shivar Abhiyaan 2.0) सुरु केलं आहे. यामध्ये पुणे (Pune) जिल्ह्यातील 187 गावात हे अभियान राबवण्यास जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समितीने मंजुरी दिली आहे. या अभियानांतर्गत मृद व जलसंधारणाच्या कामात शासकीय यंत्रणेने लोकसहभागाला प्राधान्य देण्याबरोबरच अशासकीय तसेच खासगी संस्थांचाही योग्य सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.


जलयुक्त शिवार अभियान 2.0 अंतर्गत गाव निवडीसंदर्भात जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतीच बैठक संपन्न झाली. या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे, उपजिल्हाधिकारी  वनश्री लाभशेटवार, जिल्हा जलसंधारण अधिकारी  सुजाता हांडे यांच्या समवेत जलयुक्त शिवार अभियान 2.0 जिल्हास्तरीय समितीतील सदस्य उपस्थित होते. गाव आराखडा शासनाच्या मार्गदर्शन सूचनेप्रमाणे तयार करावा. अभियानांतर्गत निवडलेल्या गावांमध्ये शिवारफेरी करून पाणलोटनिहाय गावाचा आराखडा तयार करावा. हे अभियान जिल्ह्यात मोहीम स्तरावर राबवायचे आहे, असेही त्यांनी सांगितले.



अभियानासाठी निवडलेली पुणे जिल्ह्यातील 187 गावे


हवेली तालुका 17 गावे


जांभळी, खेड, कोलवाडी, रामोशीवाडी, मांजरी खु., मांडवी बु., माणेखडी, मोगरवाडी, मोकरवाडी, शिवापूर, वांजळेवाडी, आर्वी तानाजीनगर, आगळंबे, कल्याण, खामगांव मावळ, घेरासिंहगड, खडेवाडी.



शिरूर तालुका 17 गावे


चौधरवाडी (केंदूर), झगडेवाडी, महादेववाडी, माळवाडी आगरकरवाडी, पऱ्हाडवाडी, सुक्रेवाडी, मुखई, जातेगांव बु., पाबळ, खैरेनगर, धामारी, कान्हुर मेसाई, मिडगुलवाडी, शिक्रापूर, विठ्ठलवाडी, सविंदणे, थोरातवाडी (मलठण) 


खेड तालुका 20 गावे


गोलेगांव, कासारी, कोहिंडे खु., परसूल, वाळद, वेव्हावळे, वाघू, येनिये खु., भोसे, वाफगांव, जऊळके बु., चिंचबाईवाडी, वरूडे, गाडकवाडी, कन्हेरसर, पूर, गोसासी, गुळाणी, वाकळवाडी, चौधरवाडी.
मावळ तालुका (१३ गावे): बेलज, नाणे, नानोली ना.मा, कुसगांव प.मा, जांभुळ, बेडसे, शिवाली, ओझर्डे, शिळींब, साते, इंगळुन, पिंपरी, डाहुली 


जुन्नर तालुका 12 गावे


बुचकेवाडी, धोलवड, डिंगोरे, डुंबरवाडी, घंगाळदरे, कुसुर, मालवाडी, नेतवाडी, उंब्रज, शिंदे, शिवली, धालेवाडी तर्फे मिन्हेर 


आंबेगाव तालुका 13 गावे


आपटी, कळंबई, कोंढवळ, गाडेवाडी, तेरुंगण, नानवडे, निमडाळे, मेघोली, मेनुंबरवाडी, वरसावणे, गिरवली, माळीण, काठापूर बुद्रुक 


पुरंदर तालुका 14 गावे


जाधववाडी, काळेवडी, कुंभारवळण, मुंजवडी, पठारवाडी, पवारवाडी, कोडीत ख., राजेवाडी, बांदलवाडी, चिवेवाडी, मिसाळवाडी, नाझरे कडेपठार, ढालेवाडी, सासवड


वेल्हा तालुका 4 गावे


अंत्रोली, पाबे, कोदवडी, सोंडे सरफल 


मुळशी तालुका 6 गावे 


कातवडी, मुगावडे, निवे, आंबेगाव, सालतर, चाले 


भोर तालुका 6 गावे


म्हसर खु., भावेखल अंगसुले, कुरंगवाडी, नायगांव, गोरड म्हसवली, तळे म्हसवली 


बारामती तालुका 39 गावे


गुनवडी, मळद, कन्हेरी, डोर्लेवाडी, पिंपळी, ढेकळेवाडी, झारगडवाडी, कांबळेश्वर, सांगवी, शिरवली, काटेवाडी, माळेगांव खु., खांडज, निरावागज, मुर्टी, मासाळवाडी, मुढाळे, वढाणे, कुतवळवाडी, आंबी खु., भोंडवेवाडी, काळखैरेवाडी, चांदगुडेवाडी, बाबुर्डी, पानसरेवाडी, देऊळगांवरसाळ, नारोळी, कोळोली, दंडवाडी, सुपे, लोणीभापकर, काऱ्हाटी, माळवाडी, आंबी बु., पळशी, मोरगाव, तरडोली, अंजनगाव, सोनवडी सुपे


इंदापूर तालुका 11गावे


पिटकेश्वर, निमगांव केतकी, गोतंडी, कळस, शिंदेवाडी, काझड, बोरी, शेळगांव, भरणेवाडी, कडबनवाडी, अंथुर्णे


दौंड तालुका 15 गावे


ताम्हणवाडी, खुटबाव, नानगाव, पारगांव, पडवी, भांडगाव, डाळिंब, जिरेगाव, हिंगणीगाडा, वासुंदे, रोटी, कोठडी, मळद, नंदादेवी, बोरीऐदी 


महत्त्वाच्या बातम्या:


Jalyukt Shivar Yojana : जलयुक्त शिवारमुळं बुलढाणा जिल्ह्यातील अनेक गावं पाणीदार, 'या' पाच तालुक्यातील 33 टक्के शेती बागायत, राज्य सरकारची माहिती