पुणे : शहरातील झिकाच्या रुग्णांची (Pune Zika Virus) संख्या सातत्याने वाढत असून ती आता 16 वर गेली आहे. कोरोनाचा पहिला रुग्ण पुण्यात आढळला होता आणि झिकाचा पहिला रुग्णदेखील पुण्यात आढळला आहे. त्यामुळे पुणं हे साथीच्या रोगांचं हॉटस्फॉट बनत आहे का?  हॉटस्फॉट बनत असेल तर त्याची कारणं काय आहेत? लहान मुलांना झिकाचा धोका आहे का? असे प्रश्न समोर येत आहेत. 


पुण्यात झिकाचा रोज एक रुग्ण वाढत आहे. हे एकाच परिसरातील रुग्ण नसून विविध परिसरातील रुग्ण आहेत. आतापर्यंत 8 गरोदर महिलांना झिकाची लागण झाली आहे. त्यांना निरीक्षणाखाली ठेवलं आहे. 


खासगी रुग्णालयांशी संपर्क साधून त्यांच्यासोबत महापालिकेच्या डॉक्टरांनी बैठक घेतली आणि त्या रुग्णालयातील गरोदर महिलांची माहिती मागवली आहे. त्या रुग्णालयांनादेखील झिका संदर्भात सतर्क करण्यात आलं आहे. 


पुणं हे साथीच्या रोगाचं हॉटस्पॉट नाही


पुण्यात NIV सारख्या केंद्रीय संस्था आहेत. ज्याच्या माध्यमातून निदान करणं सोपं जातं आणि जनजागृती करता येते. त्यासोबत राज्यस्तरीय संस्था आहेत. त्यादेखील अशा प्रकारच्या साथीच्या किंवा संसर्गजन्य रोगांवर काम करतात. त्यामुळे निदान करणं किंवा व्हायरलचा प्रादुर्भाव रोखणं सोपं जातं.


झिका हा संसर्गजन्य आजार नाही


पुण्यातील वस्ती असलेल्या परिसरात आणि सोसायट्या असलेल्या परिसरातदेखील झिकाचे रुग्ण आढळले आहे. झिकाचे डास हे थोड्याशा साठलेल्या पाण्यातच तयार होतात. त्यामुळे घरात जर पाण्याची साठवणूक करत असाल तर एक दिवस ड्राय डे पाळणं गरजेचं आहे. 


झिका डासांचे अंडी आढळणाऱ्या सोसायट्यांना दंड करण्यात येतोय. मात्र दंड न करता जनजागृती करणं हा या मागचा हेतू आहे. लहान मुलांना झिकाचा धोका नाही. मात्र त्यांच्या आहाराकडे योग्य लक्ष ठेवणे, व्हायरल इन्फेक्शन होणार नाही याची काळजी घेणं गरजेचं आहे. 


झिका हा डेंग्यू आणि चिकुन गुनिया सारखा एडिस डासांमुळे पसरणारा विषाणूजन्य आजार आहे. हा आजार विशेष घातक नसला तरी झिका प्रभावित गर्भवती महिलांमध्ये जन्मलेल्या बाळांच्या मायक्रोसेफली (मेंदूचा आकार लहान असणे) या स्थितीशी संबंधित आहे. भारतात 2016 मध्ये गुजरात राज्यात प्रथम झिका विषाणूच्या संसर्गाची नोंद झाली होती.


ही बातमी वाचा: