Pune Crime News: पुणे जिल्ह्यातून (Pune News) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. इंदापूरमध्ये इयत्ता नववीत शिकणाऱ्या 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बळजबरी करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शाळेतील कारकूनाने 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बळजबरी (Pune Crime News) करण्याचा प्रयत्न केला. संबंधित मुलीने या कारकूनास प्रतिकार केल्याने त्याने मुलीला कीटकनाशकाचे औषध पाजल्याचा प्रकार समोर आला आहे.


संबधित घटना रविवारी (ता. 28) इंदापूर (Indapur) तालुक्यात घडली होती. दरम्यान अकलूजमधील खाजगी रुग्णालयात या अल्पवयीन मुलीवर उपचार सुरू होते आणि उपचारादरम्यान आज या अल्पवयीन मुलीचा मृत्यू (Pune Crime News) झाला आहे. 


रणजित जाधव असं अटक केलेल्या आरोपीचे नाव असून पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. आता मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने या आरोपी विरोधात पोलिसांकडून खूनाचा गुन्हा दाखल केला जाणार आहे. पिडीत मुलीच्या फिर्यादीवरुन आरोपी रणजित जाधव याने आपल्या घरी येऊन जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. त्याला प्रतिकार केला त्यामुळे आरोपी रणजीत जाधव याने मुलीला कीटकनाशक पाजलं (Pune Crime News) अशी फिर्याद देखील पोलिसांनी दाखल केली आहे.


मात्र, या मुलीच्या मृत्यूनंतर इंदापूर पोलीस (Indapur Police) आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न करतायेत का ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. कारण इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत संबंधित मुलीनं स्वतः औषध प्राशन केलं असं म्हटलं आहे. मात्र, याच मुलीच्या फिर्यादीवरून इंदापूर पोलिसांनी संबंधित आरोपीने आपल्याला औषध पाजल्याचा गुन्हा यापूर्वीच दाखल केला आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणाला पोलिस आता गुंडाळण्याचा प्रयत्न करतात का? असा प्रश्न उपस्थित होत आहेत.