Weather Update Maharashtra: राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये मुसळधार पावसाने (Heavy Rain) हजेरी लावली आहे. राज्यात जुलै महिन्यात राज्यात सरासरीच्या 138 टक्के जास्त पाऊस झाल्याची माहिती आज पुणे वेधशाळेने (Pune Weather Update) दिली आहे. संपूर्ण राज्यात पुढील 4 ते 5 दिवस पावसाचा जोर कायम (Heavy Rain) राहणार असल्याची माहिती पुणे हवामान (Pune Rain) विभागातील के एस होसाळीकर (K S Hosalikar) यांनी दिली आहे.


राज्यात सरासरीपेक्षा जास्त मुसळधार पाऊस झाल्याची नोंद झाली असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली आहे. पुढील 2 ते 3 दिवस कोकण विभागात मुसळधार ते अतीमुसळधार पावसाची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवली आहे. राज्यातील अनेक धरणे 90 टक्के भरले असून पुढील काही दिवस नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन हवामान विभागाने केलं आहे. तर पुण्यात देखील पुढील 2 ते 3 दिवस चांगला पाऊस बरसेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. 


याबाबत माहिती देताना होसाळीकर म्हणाले, राज्यात सरासरीच्या 138 टक्के जास्त पाऊस झाला आहे. संपुर्ण राज्यात चांगला पाऊस झाला आहे. पुढील काही दिवस राज्यातील अनेक भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवला आहे. पुण्यात पुढढील दोन ते तील दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे. राज्यात अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुणे शहरासह घाटमाथा परिसरात मुसळधार पावसाची शक्यता आहे. 


कोणत्या विभागात सरासरीपेक्षा अधिक पाऊस 


कोकण: 41 टक्के सरासरी पेक्षा जास्त


मध्य महाराष्ट्र: 45 टक्के सरासरी पेक्षा जास्त


मराठवाडा: 27 टक्के सरासरी पेक्षा जास्त


विदर्भ: 36 टक्के सरासरी पेक्षा जास्त


पुण्यात दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसाला सुरूवात


पुण्यात दोन (Pune Rain Update) दिवस पावसाचा जोर कमी झाल्याचं दिसून येत होतं. मात्र आज पुनहा एकदा सकाळच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. पुणे शहर परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) धरण क्षेत्रातील पाणीसाठा वाढला आहे. शहर परिसरातील सर्व धरणे भरल्याने वर्षभरातील पुणेकरांची पिण्याची पाण्याची चिंता आता मिटली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सातारा आणि पुणे (Pune Rain Update) या दोन जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर आज संपूर्ण विदर्भात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळं मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे. 


पुणे जिल्ह्यातील प्रमुख धरणातील पाणीसाठ्याची आकडेवारी


भाटघर 92% 
नीरा देवघर 87%
 टेमघर 90%
 खडकवासला 81%
 पानशेत  91% 
वरसगाव 86% 
 मुळशी 91% पवना 90%
 कलमोडी 100%
 वीर धरण 92