Pune Incomtax Raid : पुण्यात आयकर विभागाकडून (Income Tax) पुण्यात सहा ठिकाणी छापेमारी सुरू आहे. यामध्ये सिटी कॉर्पोरेशनचे अनिरुद्ध देशपांडे (Aniruddha Deshpande) यांचा समावेश आहे. अनिरुद्ध देशपांडे हे पुण्यातील बडे उद्योजक आहेत. सिटी कॉर्पोरेशनचे डायरेक्टर आणि अमनोरा पार्कचे सर्वेसर्वा आहेत. अनिरुद्ध देशपांडे यांच्या घराची कार्यालयाची झाडाझडती भल्या पहाटेपासूनच सुरू करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.


आयकर विभागाकडून देशपांडे यांच्या कार्यालयासह घर आणि अन्य ठिकाणी देखील ही तपासणी केली जात आहे. आर्थिक गैरव्यवहाराच्या संशयातून ही तपासणी केली जात असल्याची प्राथमिक माहिती आहे. पुण्यातील बडे उद्योजक असलेल्या देशपांडे यांच्यावर आयकर विभागाची छापीमारी झाल्यामुळे पुण्यातील उद्योग विश्वात खळबळ उडाली आहे. देशपांडे हे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यासोबतच त्यांचे अनेक बड्या राजकीय नेत्यांशी सलोख्याचे संबंध असल्याचं बोललं जात आहे. 


सविस्तर बातमी थोड्यावेळात...