मराठा समाजाचा समावेश ओबीसी मध्ये करता येईल का हे तपासण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाने महाराष्ट्राच्या पाच विभागांमध्ये सर्व्हे करुन घेतले आहेत. पाच वेगवेगळ्या संस्थांनी हे सर्वे केले आहेत. हे सर्वे आज मागासवर्ग आयोगाच्या पुण्याच्या मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमधील कार्यालयात सादर होणार आहेत.
पाच संस्थांमार्फत केला जाणारा सर्व्हे अधिक सखोल असणारं आहे. आणि आरक्षण मिळण्यासाठी या सर्व्हेमधून मराठा समाजाच्या आर्थिक मागासलेपणासोबतच सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपण सिद्ध व्हावे लागणार आहे.
या सर्व्हेंचं विश्लेषण आणि पडताळणी करण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाने पाच आणि सहा ऑगस्टला पुण्यात विशेष बैठक बोलावली आहे. या बैठकीत आयोगाच्या कामकाजाची पुढची दिशा निश्चित होणार आहे. माजी न्यायमूर्ती एम जी गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली हा मागासवर्ग आयोग काम करतो आहे. या आयोगाचा अहवाल ज्या पाच संस्थांनी तयार केला आहे त्या संस्था पुढिलप्रमाणे आहेत.
- पश्चिम महाराष्ट्राच्या पाच जिल्ह्यांचा सर्व्हे करण्याची जबाबदारी पुण्यातील गोखले अर्थशास्त्र संस्थेकडे सोपविण्यात आली आहे.
- मुंबई आणि कोकणसाठी ही जबाबदारी रामभाऊ म्हाळगी प्रबोधीनीकडे सोपविण्यात आली आहे.
- मराठवाड्यासाठी ही जबाबदारी औरंगाबादच्या शिवाजी अकादमी या संस्थेकडे सोपविण्यात आली आहे.
- विदर्भासाठी ही जबाबदारी शारदा अकादमी या संस्थेकडे सोपविण्यात आली आहे.
- उत्तर महाराष्ट्रासाठी ही जबाबदारी गुरुकृपा संस्थेकडे सोपविण्यात आली आहे.
पुण्यातील गोखले अर्थशास्त्र संस्थेने महाराष्ट्रातील आत्महत्याग्रस्त शेतकरी, माथाडी कामगार आणि स्थलांतरित मजूर यांच्याबाबतीत एक अहवाल दीड वर्षापूर्वी तयार केला होता. ज्याचा संदर्भ मराठा समाजाच्या आर्थिकदृष्ट्या मागासलेपणासाठी दिला जातो. आताच्या पाच संस्थांमार्फत केले जाणारे सर्व्हे अधिक सखोल असणार आहेत. आणि आरक्षण मिळण्यासाठी या सर्व्हेमधून मराठा समाजाच्या आर्थिक मागासलेपणासोबतच सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपण सिद्ध व्हावे लागणार आहे.
संबंधित बातम्या
मराठा आरक्षणासाठी आत्महत्या, फेसबुक पोस्ट लिहून रेल्वेसमोर उडी
राज-उद्धव यांचा मराठा आरक्षणाला विरोध, नारायण राणेंचा दावा
माझा कट्टा : खासदार नारायण राणे यांच्याशी गप्पा
पुणे : कोण तयार करतंय मागासवर्ग आयोगाचा अहवाल?
मागासवर्गीय आयोगाची वाट न पाहता आरक्षण द्या: उद्धव ठाकरे