बारामती : एकविसावे शतक उजाडून आता बराच कालावधी उलटून गेला आहे. तरीपण आपल्या देशातील बहुसंख्य जनतेची मानसिकता 'मुलगी नको' या घृणास्पद, बुरसटलेल्या मानसिकतेमध्ये अडकली आहे. खरंतर स्त्रीचा जन्म मिळणे, बाई म्हणून जन्माला येणे ही खरंच खूप अभिमानाची आणि भाग्याची गोष्ट आहे. पण, किमान आपल्या देशात तरी प्रत्येकीच्याच बाबतीत ही घटना तेवढी आनंददायी असेल असे नाही. कारण, अजूनही मुलगी नकोशी असल्याचा प्रत्यय आज देखील अनुभवयास मिळत आहे. अशीच एक घटना बारामती तालुक्यातील डोर्लेवाडीत घडली. मुलगी झाली म्हणून पतीने रुग्णालयात पत्नीला शिवीगाळ करत मारहाण केल्याची लाजीरवाणी घटना घडली आहे.
डोर्लेवाडीतील अर्चना कृष्णा काळे या महिलेस मुलगी झाली म्हणून तिच्या नवऱ्याने तिला प्राथमिक आरोग्य केंद्रातच मारहाण व शिविगाळ करण्यास सुरुवात केली. यावेळी त्याला अटकाव करण्यासाठी आलेल्या आरोग्य केंद्रातील कर्मचारी बाळू चव्हाण गेले असता त्यांनाही महिलेचा पती कृष्णा काळे याने दगडाने मारहाण करीत गंभीर जखमी केले आहे. कर्मचारी बाळू चव्हाण यांच्या डोळ्याला आणि डोक्याला गंभीर जखम झाली आहे. त्यांच्यावर बारामतीच्या सिल्वर ज्युबली रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. कृष्णा काळे याच्यावर बारामती तालुका पोलीस ठाण्यात भा.द.वि. 353, 333, 504, 506 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.
तरुणाने ऑनलाईन 'रमी गेम'मध्ये उडवले वडिलांचे साडेदहा लाख रुपये; सायबर पोलिसांमुळे फुटलं बिंग
मुलगी का नको?
स्त्री पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात आघाडी घेत असून अंतरळात जाऊ पाहत असताना, पुरोगामी समजल्या जाणाऱ्या या महाराष्ट्रात आजही अशा घटना घडत असल्याने जनसामान्यांमध्ये प्रचंड चीड व्यक्त केली जात आहे. आपल्याला वंशाचा दिवा पाहिजे म्हणजेच मुलगा पाहिजे, मग मुलगी नको. भारतीय कुटुंबांमध्ये मुलांना अधिक प्राधान्य देणे, मुलीच्या लग्नासाठी हुंडा द्यावा लागतो, समाजात स्त्रियांचा दर्जा दुय्यम आहे, अशा काही गैरसमजांमुळे आणि अन्य असामाजिक कारणांनी मुलींच्या जन्माचे स्वागत केले जात नाही. त्यामुळे सोनोग्राफी सेंटर्सच्या मदतीने प्रसुतीपूर्व लिंगनिदान करून स्त्री भ्रूणहत्या करण्याची प्रवृत्ती बोकाळली आहे.
Unlock 1.0 | पुण्यात आजपासून सलून, ब्युटी पार्लर सुरु; वाढलेल्या खर्चामुळे अधिक पैसे मोजावे लागणार