खातेदारांची बनावट व्हिसा कार्ड तयार करण्यात आली. ती वापरुन 21 देशात वेगवेगळ्या लोकांनी पैसे काढले. प्रत्यक्षात खऱ्या व्हिसा कार्डचा वापर झाला नाही. त्यापुढे जाऊन हाँगकाँगमधील हॅनसेन बँकेतील एलएम ट्रेडिंग कंपनीतही स्विफ्ट मेसेजिंग सिस्टिमद्वारे 13 कोटी 50 लाख ट्रान्सफर करण्यात आले. जे रिकव्हर करण्यासाठी बँक प्रयत्नशील असल्याचा दावा केला जातोय.
कॉसमॉस बँकेवर डिजिटल दरोडा, दोन तासात 94 कोटी गायब!
दरम्यान, हा दरोडा नेमका पडला कसा, यासाठी हॅकर्स काय करतात याबद्दल आम्ही सायबर सिक्युरिटी एक्स्पर्ट मुस्लीम कोसर यांच्याशी बातचीत केली.
मुस्लीम कोसर यांच्या म्हणण्यानुसार, बँकेच्या नेटवर्कमध्ये सर्व्हर असतात. हे बहुतेककरून स्विफ्ट या नावाच्या सिस्टिमचे हे सर्वर असतात. अटॅकर आधी या सर्व्हरला छेद देण्याचा प्रयत्न करतात. त्यात ते यशस्वी झाल्यावर ते सर्व्हरला हॅक करतात. एकदा हे झालं की त्यांचं काम सोपं होतं. त्यांनतर बँकेतून भारताबाहेरच्या इतर खात्यांमध्ये पैसे पाठवणं शक्य होतं. हे पैसे पाठवण्याचं काम अनेक पातळीवर करणं शक्य आहे.
यातली शेवटची पायरी म्हणजे 'कॅश आऊट'... म्हणजे फेरफार केलेले हे पैसे त्या अकाऊंटमधून पैसे बाहेर काढणं. कॅश आऊटही अनेक पद्धतींनी होऊ शकतं. ते पैसे दुसऱ्या अकाऊंटमध्ये पाठवू शकतात, एटीएम कार्डही वापरलं जाऊ शकतं. एक मोठी रक्कम बँकेतून हॅक करून काढल्यावर ती अनेक अकाऊंटमध्ये छोट्या-छोट्या रकमेच्या स्वरूपात विभागली जाते. त्यामुळे कॅश आऊट करण सोपं होतं. त्यामुळे हा हल्ला ट्रेस बॅक करणंही कठीण होऊन बसतं, असं मुस्लीम कोसर सांगतात.
VIDEO : मुस्लीम कोसर यांच्याशी बातचीत