Pune Crime News: तरुणीसोबत मैत्रीचे आमिष दाखवून एका तरुणाचे 18 लाख 37 हजार रुपये लुटल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सिंहगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार हे एका खासगी कंपनीत कर्मचारी आहेत. दोन महिन्यांपूर्वी रिना नावाच्या महिलेने त्यांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला आणि एका वेबसाइटच्या माध्यमातून हाय-प्रोफाइल तरुणींशी मैत्री केली, असे तक्रारदाराने सांगितले.
सगळ्यासाठी वेबसाईटवर नोंदणी करावी लागणार असल्याचे रिनाने सांगितले. त्यानंतर रिनाने त्याच्या मोबाईल क्रमांकावर काही तरुणींचे फोटो त्याला पाठवले.फोटो पाठवल्यानंतर तरुणीची निवड करण्यास सांगितले. तरुणीची युवकाने निवड केली. काही दिवस त्यांनी व्हाट्सअपच्या माध्यमातून बोलत होते. दरवेळी वेगळे पैसै भरावे लागेल असं सांगण्यात आलं. एकेक करुन तब्बल 18 लाख 37 हजार रुपये तरुणीला पाठवले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदाराने पोलिसांत तक्रार दाखल केली. तक्रारदारासोबतच अनेक मोबाईल क्रमांकांवर संपर्क साधल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे अधिक तपास करत आहेत.
इंस्टाग्रामवरुन पेटला वाद; अल्पवयील मुलावर तीन तरुणांकडून धारदार शस्त्राने वार
इंस्टाग्रामवरील एका क्षृल्लक कारणामुळे दोन संघात वाद झाला. त्यामुळे तीन अल्पवयीन मुलांनी एका मुलावर शस्त्राने वार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील वडगाव बुद्रुक या परिसरात ही घटना घडली आहे. इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या स्टेटसमुळे दोन संघात वाद झाला. दोन्ही संघाकडून शेअर करण्यात आलेली माहिती एकमेकांना खटकली. या कारणामुळे धारदार शस्त्राने हे वार करण्यात आले आहे.याप्रकरणी पुणे शहर पोलिसांनी तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. पुणे शहरातील वडगाव बुद्रुक परिसरात रविवारी सुमारे साडे चार वाजता ही घटना घडली. पीडित एटीएममध्ये पैसे काढायला गेला होता. त्यादरम्यान आरोपी असलेल्या तिघांनी त्याचा पाठलाग केला. त्यानंतर भरदिवसा आरोपी असलेल्या तीन मुलांनी धारदार शस्त्रांनी अल्पवयीन मुलावर हल्ला केला. या घटनेत पीडित गंभीर जखमी झाला आहे.