पुणे : पुणे जिल्ह्यात (Pune News) जोरदार पाऊस (Rain News) झाला आहे. धानोरी भागात दुपारपासून जोरदार पाऊस पाहायला मिळत आहे. धानोरी परिसरात मुसळधार पाऊस झाल्यानंतरची पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. स्थानिक लोकांचं दुकानदारांचा मोठं नुकसान झालं आहे. पहिल्या पावसानंतर पुण्यातील धानोरी भागात जनजीवन विस्कळीत परिस्थिती झाली आहे. अनेक भागांमध्ये पाणी भरलं आहे, लोकांच्या घरामध्ये पाणी शिरलं आहे. महापालिकेकडून पावसापूर्वीची कामं झाली आहेत का नाही, असा प्रश्न पुणे करांकडून विचारला जात आहे.
पुणे जिल्ह्यात जोरदार पाऊस
पुण्यामध्ये दुपारी काही वेळासाठी झालेल्या मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचलं आहे. एवढ्या कमी वेळेसाठी पाऊस पडून एवढं पाणी साचत असेल, तर महापालिकेनं नेमकं काय काम केलं आणि मान्सूनपूर्वी काय तयारी केली आहे, असा सवाल उपस्थित होत आहे. धानोरी भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यांना तळ्याचं स्वरुप आलं आहे. रस्त्यावर उभ्या चार चाकी गाड्या पाण्याखाली गेल्या आहेत.
घरांत, रस्त्यांवर पाणीच पाणी
पुणे महापालिकेकडून दरवर्षी मान्सून पूर्व तयारीसाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. पण आज पुण्यात काही वेळासाठी पाऊस पडला. धानोरी परिसरात दुपारी जोरदार पाऊस पाहायला मिळाला. अगदी काही वेळासाठी झालेल्या पावसाने पुणेकरांची दैना उडाली. लोकांच्या दुकानात आणि घरात, पाणी शिरलं. नाले वाहू लागले, रस्त्यावर पाणी साचलं. अक्षरक्ष:रस्त्यावर गुडघाभर पाणी साचल्याचं दिसून येत आहे. याचे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पालिकेच्या कामावर पुणेकरांचं प्रश्नचिन्ह
मान्सून पूर्वीच्या कामांसाठी पुणे पालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करुनही पुणेकरांचा हाल झाल्याचं दिसत आहे. काही तासांच्या पावसाने पुण्यातील रस्त्यावर पाणी साचलं आहे. पहिल्या पावसाने पुण्यात पाणी साचल्याची परिस्थिती पाहायला मिळत असेल, तर संपूर्ण पावसाळ्याता पुण्यातील परिस्थिती काय असेल, पुणेकरांचे असेच हाल होणार का, असा सवाल सध्या पुणेकरांकडून उपस्थित केला जात आहे.
पुढील 48 तासांत पावसाची शक्यता
पुण्यासह राज्यात विविध भागात पुढील 48 तासांत पावसाची शक्यता हवामान विभागाने याआधीच वर्तवली आहे. आज कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई आणि उपनगरात उष्णतेच्या लाटेचा इशारा आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :