Girish bapat On Balgandharva Rangamandir: कलावंत, रसिक आणि लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता बालगंधर्व पाडण्याचा निर्णय घेतल्याचा आरोप भाजप खासदार गिरीश बापट यांनी केला आहे. बालगंधर्वच्या बाबतीत लोकांच्या भावना फार तीव्र आहे. बालगंधर्वची अवस्था चांगली नाही आहे .पुण्यामध्ये बालगंधर्वसारखा मोठा प्रोजेक्ट करताना त्याचं प्रारुप तयार केल्यानंतर लोकांकडून सुचना मागवण्यापेक्षा त्या आधी सुचना का घेतल्या नाहीत?, असा प्रश्न त्यांनी पालिका प्रशासनाच्या विरोधात उपस्थित केला आहे. 


संवाद नसला की वाद वाढतो. महापालिकेच्या रोजच्या कामाकाजात लुडबूड करण्याची आमची ईच्छा नाही, हे पालिकेने कायम लक्षात ठेवावं. मात्र कलाकार आणि बाकीच्यांना विश्वासात घ्यायला हवं होतं, असंही ते म्हणाले. कोणत्यात पक्षाला, कलाकारांना, माजी महापौरांना किंवा कलाकारांच्या शिष्ठमंडळांपैकी कोणालाच विश्वासात घेतलं नाही. त्यांनी आम्हाला सगळ्यांना बोलवून या प्रोजेक्टबाबत सगळी माहिती द्यावी. त्यानंतर आम्ही सल्ला किंवा सुचना देवू. आम्ही सुधारण्याचं काम केलं नाही मात्र बिघडवण्याचं काम करणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. 


दरम्यान, पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिराच्या पुनर्विकासाच्या नावाखाली सुरु असलेलं राजकारण काही थांबायचं नाव घेत नाही आहे. पुनर्विकासासाठी बालगंधर्व रंगमंदिराच पाडकाम करण्यावर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं एकमत झालं असतानाच, भाजप खासदार गिरीश बापटांनी मात्र विरोधाचा सूर आळवलाय.कलावंत, रसिक आणि लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता या निर्णय घेतल्याचा आरोप भाजप खासदार गिरीश बापटांनी केलाय.


पुण्यातील बाकी नाट्यगृहाकडे दुर्लक्ष-
पुण्यात एकून 14 नाट्यगृह आहेत. त्यातील तीन नाट्यगृह सुरू आहेत. बाकी नाट्यगृहात योग्य सुधारणा करुन ती नाट्यगृहे कलाकारासाठी सुरु करुन देणं गरजेचं असताना बालगंधर्व रंगमंदिराचा पुनर्विकास करणं गरजेचं नाही. बालगंधर्व सारखी वास्तू कुठेही नाही, असं मत सामान्य नागरिकांनी व्यक्त केलं आहे.


पुनर्विकासानंतर कसं असेल बालगंधर्व रंगमंदिर?
सध्या केवळ 500 फुटाचं कलादालन उपलब्ध असलेल्या बालगंधर्व रंगमंदिराच्या नव्या वास्तूमध्ये आता सुसज्ज अशी 10 हजार फुटांचे एक आणि प्रत्येकी पाच हजार फुटांची दोन अशी तीन नवीन कलादालने उभारण्यात येणार आहेत. शिवाय यात पु. ल. देशपांडे आणि बालगंधर्व रंगमंदिराच्या 54 वर्षांच्या प्रवासाच्या स्मृती कायमस्वरुपी जतन करण्यात येणार आहेत.