GBS Patient in Pune : GBS या आजारामुळे पुणेकरांची चिंता वाढलीये. जीबीएस रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. आज एकाच पुण्यात दिवसात जीबीएसचे 10 रुग्ण वाढ झालीये. सध्या पुण्यात एकूण जीबीएस रुग्णांची संख्या 140 वर पोहोचलीये. यातील 18 रुग्ण सध्या व्हेंटिलेटरवर आहेत. पुण्यात 3 रुग्णांचा GBS मुळे मृत्यू झालाय. तर सोलापूरातही एकाने जीव गमावलाय.
पुण्यात जीबीएसच्या रुग्णसंखेचा आलेख वाढताच-
एकाच दिवसात १० रुग्णांची वाढ
रुग्णांची एकूण संख्या १४० वर
१८ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहे
९८ रुग्णांची जीबीएसचे रुग्ण म्हणून निश्चिती झाली आहे
२६ रुग्ण पुणे मनपा
७८ रुग्ण (सिंहगड रोड, नांदेड गाव, किरकिटवाडी )
१५ पिंपरी चिंचवड
१० पुणे ग्रामीण
पुण्यात जीबीएस बाधित रुग्णाचा तीन जणांचा मृ्त्यू झालाय. यामध्ये नांदेडगाव परिसरातील 65 वर्षीय नागरिकाचा देखील समावेश आहे. या रूग्णावरती मागील 15 दिवसांपासून ससून रुग्णालयात उपचार सुरू होते. पुण्यातील नांदेडगावात अनेक रुग्ण हे जीबीएस (Guillain Barre Syndrome) बाधित आहेत, त्यातील हा एक रुग्ण होता. पुण्यातला तिसरा आणि राज्यातला चौथ्या जीबीएस (Guillain Barre Syndrome) बाधित रुग्णाचा मृत्यू झाला झाल्याने आता चिंता वाढली आहे. तर पुणे शहरामध्ये नांदेडगाव, सिंहगड रस्ता परिसर या ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये जीबीएस (Guillain Barre Syndrome) बाधित रूग्ण आढळून आले आहेत.
पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सांगलीनंतर आता साताऱ्यात सुद्धा जीबीएसचा शिरकाव झाला आहे. सातारसह कराडमध्येही रुग्ण आढळले आहेत. त्यांच्यावर विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत. सातारा जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच जीबीएसचे चार रुग्ण आढळून आले आहेत. यामधील एक रुग्ण जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहे तर दोन रुग्ण साताऱ्यातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. तर एक रुग्ण कराडमध्ये उपचार घेत आहे. या सर्व रुग्णांची प्रकृती चांगली असून त्यांच्यावर वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. नागरिकांनी या आजाराची भीती बाळगू नये तसेच अफवा पसरू नये. असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर युवराज करपे यांनी केले आहे..
जीबीएस रोग म्हणजे काय?
GBS ही एक दुर्मिळ स्थिती आहे ज्यामुळे अचानक बधीरपणा आणि स्नायू कमकुवत होतात, ज्याच्या लक्षणांमध्ये हातपाय गंभीर कमजोरी, अतिसार इ. डॉक्टरांच्या मते, जीवाणू आणि विषाणूजन्य संसर्ग सामान्यत: जीबीएसला कारणीभूत ठरतात कारण ते रुग्णांची प्रतिकारशक्ती कमकुवत करतात आणि सध्याच्या परिस्थितीत, हा रोग दूषित पाण्यामुळे सुरू झाल्याचा संशय आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या