- मुख्यपृष्ठ
- INDIA AT 2047
- IPL 2024
- क्रिकेट
- निवडणूक
- अयोध्या राम मंदिर
- भारत
- विश्व
- महापालिका निवडणूक 2022
- टेलिव्हिजन
- सिनेमा
- औरंगाबाद
- उस्मानाबाद
- मुंबई
- पुणे
- नाशिक
- नागपूर
- कोल्हापूर
- सोलापूर
- क्रीडा
- फोटो
- राशीभविष्य
- वेब स्टोरी
- वर वधू
- धार्मिक
- शिक्षण
- ट्रेंडिंग न्यूज
- आरोग्य
- लाईफस्टाईल
- क्राईम
- राजकारण
- शेत-शिवार
- व्यापार-उद्योग
- पर्सनल फायनान्स
- म्युच्युअल फंड्स
- आयपीओ
- जॅाब माझा
- ऑटो
- टेक-गॅजेट
- ब्लॉग
- उपयुक्तता
- संपर्क करा
- IDEAS OF INDIA
Pune Ganpati Visarjan 2025 Live Update : पुण्यातल्या विसर्जन मिरवणुकीने मागच्या वर्षीचा रेकॉर्ड मोडला; 28 तास उलटून गेले मिरवणूक सुरूच
Pune Ganpati Visarjan 2025 Live Update : आज अनंत चतुर्दशी असल्याने राज्यभरात दहा दिवसांच्या गणेशोत्सवाला निरोप दिला जात आहे.
पार्श्वभूमी
Pune Ganpati Visarjan 2025 Live : आज अनंत चतुर्दशी असल्याने राज्यभरात दहा दिवसांच्या गणेशोत्सवाला निरोप दिला जात आहे. पुण्यासह मुंबई, ठाणे, नाशिक, कोल्हापूरसह इतर शहरांमध्ये सकाळपासूनच गणपती बाप्पांची उत्तरपूजा पार...More
वनराज आंदेकर च्या भाच्याचा स्कूल होईल याचा पुणे पोलिसांना अंदाजच नव्हता
गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला झालेल्या हत्यानंतर पुणे पोलिसांनी स्वतः दिली कबुली
सात पिढ्या लक्षात ठेवतील अशा पद्धतीने पुणे पोलीस गँगस्टर वर करणार कारवाई
आंदेकर टोळी प्रमुख बंडू आंदेकर वर गुन्हा दाखल..
कोणत्याच गॅंगछ्या आणि गँगस्टरच्या चुकीला माफी नाही
ओमकार हत्या प्रकरण हे टोळी युद्धातूनच झाल्याचं आतापर्यंतच्या तपासात समोर
19 वर्षीय आयुष गोमकर याची हत्या ही टोळी युद्धातून झाली आहे आणि याप्रकरणी पुणे पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतलंय आणि त्यांची पुणे पोलीस कसून चौकशी करत आहे
या चौकशीतून काय समोर येत हे पहावं लागणार आहे.
वनराज आंदेकर यांच्या भाच्याचीच म्हणजेच बहिणीच्या मुलाची हत्या करतील याचा पुणे पोलिसांना अंदाज नव्हता..
पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांचा गँगवॉरवर टिकटॅक
आंदेकर टोळीच्या बंडू आंदेकरविरोधात गन्हा दाखल झाला, मात्र स्वतःच्या नातवाची हत्या करतील असं आम्हाला वाटलं नव्हतं
अशी काही हत्या होईल असे आम्हाला वाटले नव्हते
अशाप्रकारे पुण्यात कायदासुव्यस्थेचा प्रश्न निर्माण कऱणाऱ्यांना पुणे पोलिस सो़डणार नाही
मकोकाअंतर्गत कारवाई सुरू होईल
आरोपींची माहिती, प्रॉपर्टी डिटेल्स घेणं सुरू आहे
क्राईम ब्रांचने काही दिवसांपुर्वी एका आरोपीला अटक केली होती, मात्र स्वतःच्या नातेवाईची हत्या करतील असं आम्हाला वाटलंच नव्हतं
शहरातील गणेश विसर्जन मिरवणूक सहा तासावरून गेली एकतीस तासांवर गेली आहे. दरवर्षी पेक्षा यावर्षी जास्त वेळ लागला आहे. 1984 पासुनची आकडेवारी बघितली तर गणपती विसर्जन मिरवणुकीच्या तासात सतत्याने वाढ झाली आहे. त्यामुळे सरासरी 30 तासांचा विक्रम यांना मोडीत निघाला. यंदा मिरवणूक कमी वेळेत करण्यासाठी पुणे पोलिसांचे प्रयत्न अपयशी ठरले आहेत. पुणे पोलिसांची सुक्ष्म नियोजन फसलं का अशी चर्चा आहे.
पुण्यातल्या अलका टॉकीज चौकातून ३ वाजेपर्यंत २३२ गणपती मंडळ विसर्जनासाठी मार्गस्थ झाले आहेत. अजून ९-१० मंडळ या अलका टॉकीज चौकातून मार्गस्थ व्हायचे आहेत. ३० तास उलटून गेले तरी मिरवणूक सुरूच आहेत. भर पावसात भिजत, नाचत, वाजत गाजत पुणेकरांचा बाप्पला निरोप दिला जात आहे.
पुण्यातल्या विसर्जन मिरवणुकीने मागच्या वर्षीचा रेकॉर्ड मोडला आहे. २८ तास उलटून गेले तरी मिरवणूक सुरूच आहे. मागच्या वर्षी २८ तास मिरवणूक सुरू होती.
पुणे पोलिस गणपती मंडळांपुढे हतबल झाले आहेत. अलका टॉकीज चौकात गर्दीच्या ठिकाणी काहींनी फटाके उडवले . नियोजन करूनही पुण्यातील विसर्जन मिरवणूक रेंगाळली आहे. एकजण ताब्यात घेतला असून पोलिसांच्या नाकावर टिचून चौकात फटाके फोडले जात आहेत.
पुण्यात सकाळी ११:३० वाजेपर्यंत १६३ गणेश मंडळ अलका टॉकीज चौकातून विसर्जन घाटाकडे मार्गस्थ झाले आहेत. अजून किमान ६०-७० मंडळ मार्गस्थ व्हायचे आहेत. मिरवणूक संपायला २-३ वाजण्याची शक्यता आहे.
पुण्यात सकाळी ११:३० वाजेपर्यंत १६३ गणेश मंडळ अलका टॉकीज चौकातून विसर्जन घाटाकडे मार्गस्थ झाले आहेत. अजून किमान ६०-७० मंडळ मार्गस्थ व्हायचे आहेत. मिरवणूक संपायला २-३ वाजण्याची शक्यता आहे.
पुण्यात सकाळी ११:३० वाजेपर्यंत १६३ गणेश मंडळ अलका टॉकीज चौकातून विसर्जन घाटाकडे मार्गस्थ झाले आहेत. अजून किमान ६०-७० मंडळ मार्गस्थ व्हायचे आहेत. मिरवणूक संपायला २-३ वाजण्याची शक्यता आहे.
पुण्यात सकाळी ११:३० वाजेपर्यंत १६३ गणेश मंडळ अलका टॉकीज चौकातून विसर्जन घाटाकडे मार्गस्थ झाले आहेत. अजून किमान ६०-७० मंडळ मार्गस्थ व्हायचे आहेत. मिरवणूक संपायला २-३ वाजण्याची शक्यता आहे.
पुण्यात सकाळी ११:३० वाजेपर्यंत १६३ गणेश मंडळ अलका टॉकीज चौकातून विसर्जन घाटाकडे मार्गस्थ झाले आहेत. अजून किमान ६०-७० मंडळ मार्गस्थ व्हायचे आहेत. मिरवणूक संपायला २-३ वाजण्याची शक्यता आहे.
पुण्यातील अलका टॉकीज चौकात आतापर्यंत १३७ मंडळाच्या गणपतीच विसर्जन पार पडलंय. मिरवणुकीला २४ तास उलटले पण अलका टॉकीज चौकात अजून किमान ७० ते ८० मंडळ दाखल व्हायचे आहेत. त्यामुळे यंदाही मिरवणुक रेंगाळ्याच दिसत आहे.
गणपती मंडळाचा पुणे पोलिसांना सलाम करण्यात आला आहे, वर्दीतले देवमाणूसच्या देखाव्याने सगळ्यांच लक्ष वेधलं. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचं कार्टून काढत पोलिसांना सलाम केला. वेगवेगळ्या प्रकारच्या सूचना देखील त्यावर लिहिण्यात आल्या आहेत.
पुण्यातील विसर्जन मिरवणूकीला २४ तास पुर्ण, मात्र अजुनही मोठ्या प्रमाणात गणपती मंडळांच्या विसर्जन मिरवणूका सुरु आहेत. काल साडेनऊ वाजता पुण्यातील विसर्जन मिरवणूकीला सुरुवात झाली होती. पाच मानाच्या गणपतींचे आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे विसर्जन वेळेत झाले. मात्र त्यानंतर पुण्याची विसर्जन मिरवणूक रेंगाळली. पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूक अजून ही सुरूच आहे, मिरवणुकीला काल सकाळी साडेनऊ वाजता सुरुवात झाल्यानंतर आत्ताही मिरवणुका सुरूच आहेत.
मानाचा पहिला कसबा गणपती
-3:47 वाजता म्हणजे 6 तास 17 मिनिटांनी विसर्जन झालं.
मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी गणपती
-4:10 वाजता म्हणजे 6 तास 40 मिनिटांनी विसर्जन झालं.
मानाचा तिसरा गुरुजी तालीम-
4:35 वाजता म्हणजे 7 तास 05 मिनिटांनी विसर्जन झालं.
मानाचा चौथा तुळशीबाग गणपती
-4:59 वाजता म्हणजे 7 तास 29 मिनिटांनी विसर्जन झालं.
मानाचा पाचवा केसरीवाडा गणपती
-5:39 वाजता म्हणजे 8 तास 09 मिनिटांनी विसर्जन झालं.
-तर दगडू शेठ हलवाई गणपती मिरवणूक सायंकाळी ४ वाजता सुरू झाली..विसर्जन ९ वाजून २३ मिनिटांनी म्हणजेच ५ तास २३ मिनिटांनी झाले.भाऊ रंगारी गणपती ३ वाजून २१ मिनिटांनी अलका चौकात पोहचला त्यानंतर त्याचे विसर्जन झाले.
लालबागचा राजाला निरोप देण्यासाठी गिरगाव चौपाटीवर भक्तांची प्रचंड गर्दी. आता थोड्याचवेळात लालबागचा राजाची आरती केली जाईल. त्यानंतर लालबागचा राजाला स्वयंचलित तराफ्यावर बसवून खोल समुद्रात नेले जाईल.
Lalbaugcha Raja Visarjan 2025: लालबागचा राजा 22 तासांनी विसर्जनासाठी पोहोचला, गिरगाव चौपाटीवर गणेशभक्तांची प्रचंड गर्दी. PHOTO पाहण्यासाठी क्लिक करा.
Lalbaugcha Raja Visarjan 2025: रात्रीचा अंधार, मुसळधार पाऊस, तरीही लालबागचा राजाच्या दर्शनाला तुफान गर्दी. PHOTO पाहण्यासाठी क्लिक करा
मानाचा पहिला कसबा गणपती - 4:35 वाजता म्हणजे 6 तास 35 मिनिटं मिरवणूक चालली
मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी गणपती - 5:10 वाजता म्हणजे 7 तास 10 मिनिटं मिरवणूक चालली.
मानाचा तिसरा गुरुजी तालीम गणपती - 6:44 वाजता म्हणजे 8 तास 44 मिनिटं मिरवणूक चालली.
मानाचा चौथा तुळशीबाग गणपती - 7:15 वाजता म्हणजे 9 तास 15 मिनिटं मिरवणूक चालली.
मानाचा पाचवा केसरीवाडा गणपती - 7:33 वाजता म्हणजे 9 तास 33 मिनिटं मिरवणूक चालली.
यंदा मिरवणूक 9:30 वाजता सुरु झाल्या आणि 5:39 वाजता म्हणजे 8 तास 09 मिनिटांनी मिरवणूक संपली तर गेल्या वर्षी 10 वाजता सुरु झालेल्या मिरवणुका 9 तास 33 मिनिटं चालली होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मानाच्या गणपतींची मिरवणूक 1 तास 24 मिनिटं आधी संपली.
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पाची मिरवणूक जल्लोषात पार पडल्यानंतर बाप्पाचं पर्यावरण पूरक हौदामध्ये विसर्जन करण्यात आलं. डेक्कन परिसरातील पांचाळेश्वर या घाटावर भाऊसाहेब रंगारी गणपतीचं विसर्जन करण्यात आलं आहे. गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या जय घोषात बाप्पांना निरोप देण्यात आला.श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती विसर्जन पहाटे 3.50 वाजता झालं.
पुण्यातील विसर्जन मिरवणूक दुसऱ्या दिवशी देखील सुरुच. काल रात्री बारा वाजता डीजे बंद करण्यात आल्याने अनेक गणेश मंडळांनी त्यांची विसर्जन मिरवणूक जागेवर थांबवण्याचा निर्णय घेतला होता. पहाटे सहा वाजता या मंडळांनी पुन्हा डीजे सुरु करुन विसर्जन मिरवणूक पुन्हा सुरु केली आहे. पोलीस ही विसर्जन मिरवणूक लवकर संपवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. दरम्यान काल मध्यरात्री नंतर पुण्यातील श्रीमंत भाऊसासेब रंगारी , अखील मंडई , हुतात्मा बाबू गेणू या गणेश मंडळांच्या गणपतींचं विसर्जन पार पडलं आहे.
पुण्यातील सार्वजनिक गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुकीला १२ तास पूर्ण
दगडूशेठ गणपती चे रात्री 9 वाजून 23 मिनीटांनी विसर्जन पूर्ण
सकाळी साडेनऊ वाजता सुरू झाली होती पुण्यातील सार्वजनिक गणेश मंडळांची विसर्जन मिरवणूक
पुण्यातील लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता, टिळक रस्त्यावरून विविध गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुका सुरू
पुण्यातील दगडुशेठ गणपतीचा रथ अलका चौकात दाखल झाला आहे. दुपारी 4 वाजता विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाला होता. 4 तासात तो अलका चौकाच्या जवळ आला आहे. .
सातारा शहरात गणपती विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली असून शहरातील मोठ्या गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीसाठी जिल्हा प्रशासनाने आणि नगरपालिका प्रशासनाने मोठी तयारी केली आहे. अनेक ठिकाणी कृत्रिम तलाव उभारले आहेत.याची पाहणी पालकमंत्री शंभूराज देसाई जिल्हाधिकारी संतोष पाटील पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांनी केली... यावेळी डॉल्बी मर्यादा पेक्षा जास्त लावल्यास कारवाई करण्याच्या सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केल्या आहेत यावेळी त्यांनी पारंपारिक वाद्य वाजवून विसर्जन करणाऱ्या शिंदे मळा येथील ओमकार गणेशोत्सव मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीत स्वतः ढोल वाजवून सहभागी झाले यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी देखील ढोल वाजवून या मिरवणुकीमध्ये सहभाग नोंदवला.
मानाचा पहिला कसबा गणपती - 3:47 वाजता म्हणजे 6 तास 17 मिनिटांनी विसर्जन झालं.
मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी गणपती - 4:10 वाजता म्हणजे 6 तास 40 मिनिटांनी विसर्जन झालं.
मानाचा तिसरा गुरुजी तालीम - 4:35 वाजता म्हणजे 7 तास 05 मिनिटांनी विसर्जन झालं.
मानाचा चौथा तुळशीबाग गणपती - 4:59 वाजता म्हणजे 7 तास 29 मिनिटांनी विसर्जन झालं.
मानाचा पाचवा केसरीवाडा गणपती - 5:39 वाजता म्हणजे 8 तास 09 मिनिटांनी विसर्जन झालं
पुण्यातील मानाचा पाचवा केसरीवाडा गणपती आज दुपारी भव्य मिरवणुकीत अलका चौकात दाखल झाला. पारंपारिक ढोल-ताशांचा गजर, लेझीम पथकांची साथ आणि टाळ-झांजांच्या तालात भक्तगण "गणपती बाप्पा मोरया"च्या घोषणांनी दुमदुमून गेले. फुलांच्या सजावटीत आणि रोषणाईच्या प्रकाशात नटलेली मिरवणूक पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. या वेळी भक्तांनी विघ्नहर्त्या बाप्पाला नम्रतेने निरोप दिला. विसर्जनाच्या मार्गावर भक्ती आणि उत्साहाची अद्भुत सांगड पाहायला मिळाली.
मानाचा पहिला - कसबा गणपती - 3:47 वाजता ( 6 तास 17 मिनिटांनी )
मानाचा दुसरा - तांबडी जोगेश्वरी गणपती - 4:10 वाजता ( 6 तास 40 मिनिटांनी )
मानाचा तिसरा - गुरुजी तालीम - 4:35 वाजता ( 7 तास 05 मिनिटांनी )
मानाचा चौथा - तुळशीबाग गणपती - 4:59 वाजता ( 7 तास 29 मिनिटांनी )
पुण्यातील पारंपरिक गणेश विसर्जन मिरवणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ढोल वाजवत सहभागी होत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ढोल-ताशांच्या गजरात आणि "गणपती बाप्पा मोरया"च्या घोषणांमध्ये त्यांनी काही क्षणांसाठी ढोल वाजवत उत्सवाचा आनंद लुटला. त्यावेळी उपस्थित कार्यकर्ते आणि नागरिकांनी जल्लोषात स्वागत केले.
पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती आज भव्य मिरवणुकीसह बेलबाग चौक पार करून लक्ष्मी रोडवर दाखल झाला आहे. पारंपारिक वाद्यांचा गजर, फुलांची सजावट आणि भक्तांच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. दुसरीकडे मानाचा चौथा तुळशीबाग गणपती दुपारी 4:59 वाजता विसर्जनासाठी घाटावर पोहोचला आणि सात तास 29 मिनिटांच्या मिरवणुकीनंतर बाप्पाला जलसमाधी देण्यात आली. भक्तांनी "गणपती बाप्पा मोरया"च्या जयघोषात बाप्पाला निरोप दिला.
पुण्यातील मानाचा चौथा तुळशीबाग गणपती आज विसर्जनासाठी घाटावर दाखल झाला आहे. पारंपरिक मिरवणूक, ढोल-ताशांचा गजर आणि भक्तांच्या जयघोषात बाप्पाला निरोप देण्यात येतोय. तुळशीबाग मंडळाचा गणपती नेहमीच आकर्षणाचे केंद्र ठरतो. विसर्जन घाटावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून बाप्पाच्या दर्शनाचा लाभ घेतला.
पुण्यातील गणेशोत्सवाची शान असलेल्या मानाच्या गणपतींचे विसर्जन आता पांचाळेश्वर घाटावर सुरू झाले आहे. मानाचा चौथा तुळशीबाग गणपती, मानाचा पाचवा केसरी वाडा गणपती आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती विसर्जनासाठी दाखल झाले आहेत. दगडूशेठ गणपतीची विसर्जनपूर्वी पोलिसांच्या हस्ते आरती करण्यात आली, यावेळी मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहून दर्शन घेतले. पारंपरिक ढोल-ताशा, लेझीम आणि भक्तिगीतांच्या गजरात बाप्पाला निरोप देताना वातावरण भावूक आणि उत्साही झाले आहे. पुणेकरांचा उत्साह पावसातही कमी झालेला नाही आणि विसर्जन मिरवणुकीला गर्दीने मोठा उत्साह मिळत आहे.
पुण्यातील मानाचा तिसरा गणपती म्हणून ओळखला जाणारा गुरुजी तालीम गणपती आज विसर्जन घाटावर दाखल होणार आहे. पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात आणि फुलांच्या वर्षावात मिरवणूक उत्साहात पुढे सरकत आहे. शहरातील प्रमुख मंडळांपैकी एक असलेल्या गुरुजी तालीम मंडळाच्या गणपतीला पाहण्यासाठी विसर्जन मार्गावर प्रचंड गर्दी झाली आहे. भक्तांचा "गणपती बाप्पा मोरया"चा अखंड जयघोष सुरू असून, संपूर्ण वातावरण भक्तीमय झाले आहे. पोलिस आणि स्वयंसेवकांकडून सुरक्षा व व्यवस्थापनाची काटेकोर तयारी करण्यात आली आहे. संध्याकाळी या मानाच्या बाप्पाचे पारंपरिक पद्धतीने विसर्जन करण्यात येणार आहे.
पुण्यातील श्रद्धेचे केंद्रबिंदू असलेले श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती आज विसर्जन मिरवणुकीत बेलबाग चौकात थोड्याच वेळात दाखल होणार आहेत. भव्य रथ ओढण्यासाठी यंदा तब्बल 7 बैल जोड्या जुंपल्या असून रथाचे वैभव आणि पारंपरिक सजावट पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली आहे. ढोल-ताशांच्या निनादात आणि फुलांच्या वर्षावात दगडूशेठ गणपतीचा रथ पुढे सरकत आहे. पुणेकरांनी "गणपती बाप्पा मोरया"च्या जयघोषात रथाचे स्वागत केले. सुरक्षा व्यवस्था मजबूत ठेवण्यात आली असून, बेलबाग चौकात भक्तांच्या उपस्थितीने दिवसरात्रासारखे वातावरण निर्माण झाले आहे.
पुण्यातील मानाचा चौथा तुळशीबाग गणपती आज विसर्जन मिरवणुकीत अलका चौकात दाखल झाला आहे. पारंपरिक वाद्यांचा गजर, ढोल-ताशांचा जल्लोष आणि भक्तांच्या "गणपती बाप्पा मोरया" या घोषणांनी परिसर दुमदुमला आहे. तुळशीबाग मंडळाचा गणपती दरवर्षी आपल्या देखण्या सजावटीसाठी आणि शिस्तबद्ध मिरवणुकीसाठी ओळखला जातो. आजही मिरवणुकीत महिला, तरुण आणि लहान मुलांनी उत्साहात सहभाग घेतला. पोलीस बंदोबस्तात सुरक्षेची काटेकोर व्यवस्था करण्यात आली आहे. संध्याकाळी उशिरापर्यंत ही मिरवणूक पुढे सरकत समुद्रकिनारी विसर्जनासाठी दाखल होणार आहे. पुणेकरांनी या ऐतिहासिक मिरवणुकीचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली आहे.
पुण्यात अनंत चतुर्थीच्या दिवशी पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात लाडक्या बाप्पाला निरोप देण्यास सुरुवात झाली आहे. शहरभर विसर्जन मिरवणुकांना वेग आला असून भाविकांची प्रचंड गर्दी दिसत आहे. यंदा डीजे बंद असल्यामुळे पारंपरिक ढोल-ताशांच्या तालावरच मिरवणुकीचे वातावरण दुमदुमले आहे. मागील महिनाभर ढोल पथकांच्या तालमी सुरू होत्या आणि आज त्याचा उत्साही जल्लोष रस्त्यावर दिसतोय. ढोल-ताशांच्या गजरात, फुगड्या आणि नृत्यांच्या थाटात बाप्पाला निरोप दिला जात आहे. श्रद्धा, भक्ती आणि उत्साहाचा संगम पुण्यातील या विसर्जन सोहळ्यात अनुभवायला मिळतोय.
पुण्यातील मानाच्या पहिल्या गणपतीचं विसर्जन, दगडूशेठची मिरवणूक सुरु, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या...
पुण्यातील मानाचा पहिला कसबा आणि मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी गणेश मंडळांची विसर्जन मिरवणूक ठरलेल्या वेळे आधी अलका चौकात पोहचल्याबद्दल पोलीस आणि प्रशासनाकडून त्यांच अभिनंदन करण्यात आलं. यावेळी पुण्यात विसर्जन मिरवणूकीच्या वेळेवरुन बरीच चर्चा पहायला मिळत होती. मात्र ग्रामदैवत कसबा आणि ग्रामदैवता तांबडी जोगेश्वरी यांनी वेळ पाळल्याबद्दल त्यांच कौतुक होतय.
मानाचा पहिला कसबा गणपती अलका चौकातुन विसर्जनासाठी मार्गस्थ होतोय.
मानाचा पाचवा गणपती मार्गस्थ झाल्यानंतर पुणे महानगरपालिका सेवकवर्ग गणेशोत्सव समिती मंडळाचा गणपती बेलबाग चौकात येतोय..
पुण्यातील मानाचा पाचवा गणपती श्री केसरी वाडा गणपती बैलबाग चौक पोहोचत आहे ..
ढोल ताशाच्या गजरात बाप्पांचं स्वागत होत आहे..
पालखी निघाली राजाचीssss, लालबागचा राजा मंडपातून निघाला 'तो' क्षण. PHOTO पाहण्यासाठी क्लिक करा.
पुण्यातील मानाचा चौथा गणपती तुळशीबाग गणपती सुंदर अशा मुलांनी सजलेल्या रथावर विराजमान होत विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाला.. पुण्यातील सर्वात उंच बाप्पा म्हणून या तुळशीबाग गणपती मंडळाची ओळख आहे.. त्याचबरोबर अडीचशे किलो चांदीने सजलेला हा गणपती आहे... बेलबाग चौकात जोरदार ढोल ताशा वादळणे या बाप्पांचं स्वागत झालं...
Mumbai Ganpati visarjan 2025: परळचा महाराजा अन् परळचा लंबोदर एकमेकांसमोर येतात तेव्हा... मानाचे गणपती विसर्जनासाठी मार्गस्थ. PHOTO पाहण्यासाठी क्लिक करा
ही शान कोणाची... लालबागच्या राजाची! लाखो भक्तांच्या डोळ्यात पाणी, गुलालाच्या उधळणीत लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु. PHOTO पाहण्यासाठी क्लिक करा
पुण्यातील अलका चौकामध्ये भव्य अशी रांगोळी काढली जात आहे. थोड्यावेळाने पहिला मानाचा गणपती अलका चौकात पोहोचेल. राष्ट्रीय कला अकादमीच्या वतीने ही रांगोळी साकारण्यात येते आहे.
मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम बेलबाग चौकात दाखल
फुलांनी सजलेल्या रथावर मानाचा तिसरा गणपति विराजमान आहे...
मानाचा तिसरा : गुरुजी तालीम मंडळ टिळक चौकातून बेलबाग चौकाकडे मार्गस्थ
मानाची तिसरा : गुरुजी तालीम मंडळ विसर्जन मिरवणूक सुरु होत आहे
गुलालाची उधळण होईल
पुण्यातील मानाच्या अन् प्रमुख गणेश विसर्जन मिरवणुकीचे वेळापत्रक
मानाच्या गणपतींची विसर्जन मिरवणुकीच्या वेळेचं नियोजन कसं असेल पाहुया
मानाचा पहिला गणपती कसबा गणपती
लोकमान्य टिळक पुतळा (सुरुवात): ९.३० वाजता
बेलबाग चौक: १०.१५ वाजता
कुंटे चौक: ११.४५ वाजता
विजय टॉकीज चौक: १.४० वाजता
टिळक चौक: २.४५ वाजता
मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी
लोकमान्य टिळक पुतळा (सुरुवात): ९.४५ वाजता
बेलबाग चौक: १०.३० वाजता
कुंटे चौक: १२ वाजता
विजय टॉकीज चौक: १.५५ वाजता
टिळक चौक: ३ वाजता
मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम
लोकमान्य टिळक पुतळा (सुरुवात): १० वाजता
बेलबाग चौक: ११ वाजता
कुंटे चौक: १२.४५ वाजता
विजय टॉकीज चौक: २.३० वाजता
टिळक चौक: ३.३० वाजता
मानाचा चौथा गणपती तुळशीबाग मंडळ
लोकमान्य टिळक पुतळा (सुरुवात): १०.१५ वाजता
बेलबाग चौक: ११.३० वाजता
कुंटे चौक: १.३० वाजता
विजय टॉकीज चौक: ३ वाजता
टिळक चौक: ४ वाजता
मानाचा पाचवा गणपती केसरीवाडा
लोकमान्य टिळक पुतळा (सुरुवात): १०.३० वाजता
बेलबाग चौक: १२ वाजता
कुंटे चौक: २ वाजता
विजय टॉकीज चौक: ३.३० वाजता
टिळक चौक: ४.३० वाजता
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती
बेलबाग चौक (सुरुवात): ४ वाजता
गणपती चौक: ४.५५ वाजता
कुंटे चौक: ६ वाजता
विजय टॉकीज चौक: ६.३० वाजता
टिळक चौक: ७.३० वाजता
अखिल मंडई मंडळ
बेलबाग चौक (सुरुवात): ७ वाजता
गणपती चौक: ७.२५ वाजता
कुंटे चौक: ८.३० वाजता
विजय टॉकीज चौक: ९.२० वाजता
टिळक चौक: ११.२५ वाजता
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळ ट्रस्ट
बेलबाग चौक (सुरुवात): ६.३० वाजता
गणपती चौक: ६.५५ वाजता
कुंटे चौक: ८ वाजता
विजय टॉकीज चौक: ९.४० वाजता
टिळक चौक: १०.४५ वाजता
लक्ष्मी रस्त्यावर मिरवणूक मार्गस्थ झाली आहे
त्याच लक्ष्मी रस्त्यावर रांगोळ्याच्या पायघड्या घालण्यात येत आहे.
कचरा व्यवस्थापन यंदाची थीम आहे
11 चौकात रंगोली काढण्यात येत आहे
अजित पवार चंद्रकांत पाटील आणि मुरलीधर मोहोळ यांच्याकडून पुण्याच्या मानाचा पहिला कसबा गणपतीच्या पालखीला खांदा
पुण्याची मिरवणूक सुरू
मानाचा पहिला कसबा गणपती मिरवणुकीसाठी मार्गस्थ
अजित पवार चंद्रकांत पाटील आणि मुरलीधर मोहोळ यांच्याकडून पुण्याच्या मानाचा पहिला कसबा गणपतीच्या पालखीला खांदा
पुण्याची मिरवणूक सुरू
मानाचा पहिला कसबा गणपती मिरवणुकीसाठी मार्गस्थ
मानाचा चौथा तुळशीबाग गणपतीच्या मिरवणूकाची तयारी सुरु आहे.
मानाचा तिसरा गुरुजी तालीम गणपती विसर्जन रथावर विराजमान झालेत. आता विसर्जन मिरवणुकीसाठी मंडईकडे मार्गस्थ होतील.
मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी मिरवुणीसाठी मंडईकडे रवाना होईल, त्यापूर्वी शंख नाद सुरू आहे
मुंबईचा राजा मंडपातून निघाला, विसर्जन मिरवणुकीला सुरुवात. मुंबईतील मानाचा गणपती म्हणून ओळख. मुंबई राजा मंडपातून निघाल्यानंतर लालबाग परिसरातील गणपती विसर्जनासाठी निघणार
गणेशगल्ली मुंबईच्या राजाच्या आरतीला संपली. विसर्जन मिरवणूक थोड्याच वेळात सुरूवात होईल
यंदा गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी पावसाची (Mumbai Rain) हजेरी लागण्याची शक्यता आहे. कालपासून मुंबईत जोरदार पाऊस सुरु आहे. मुंबईत सतत पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. आज पहाटेपासून मुंबईत पावसाची संततधार आहे. मुंबईच्या आकाशात काळ्या ढगांनी गर्दी केल्यामुळे पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. सविस्तर वाचा
चांदीच्या पालखीत कसबा गणपती विराजमान होत आहे आणि मंडई कडे मार्गस्थ होईल
मानाचा पहिला कसबा गणपतीची आरती सुरु झाली आणि थोड्या वेळात विसर्जनात मार्गस्थ होईल. त्यापूर्वी रंगोली काढण्यात येत आहे.
या मिरवणुकीचं प्रमुख आकर्षण प्रभात बँड असते.
सभा मंडपातून कसबा गणपती मंडईच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे.
जंगली महाराज रस्ता : झाशीची राणी चौक ते खंडूजी बाबा चौक
कर्वे रस्ता : नळ स्टॉप चौक ते खंडूजी बाबा चौक
फर्ग्युसन रस्ता : खंडूजी बाबा चौक ते फर्ग्युसन महाविद्यालय मुख्य प्रवेशद्वार
भांडारकर रस्ता : पीवायसी जिमखाना, नामदार गोखले चौक ते डेक्कन जिमखाना चौक (नटराज चौक)
पुणे सातारा रस्ता व्होल्गा चौक (लक्ष्मीनारायण चौक) ते जेधे चौक
सोलापूर रस्ता ढोले पाटील रस्ता (सेव्हन लव्हज चौक) ते जेधे चौक
प्रभात रस्ता डेक्कन टपाल कार्यालय ते शेलारमामा चौक
6 सप्टेंबरच्या दुपारी 12 पासून ते 7 सप्टेंबर रोजी मिरवणूक संपेपर्यंत
बाजीराव रस्ता : सावरकर रस्ता ते फुटका बुरूज चौक
कुमठेकर रस्ता : टिळक चौक ते विश्रामबाग चौक
शास्त्री रस्ता : सेनादत्त चौकी चौक ते टिळक चौक
6 सप्टेंबरच्या सकाळी 7 पासून ते 7 सप्टेंबर रोजी मिरवणूक संपेपर्यंत
छत्रपती शिवाजी महाराज रस्ता काकासाहेब गाडगीळ पुतळा जंक्शन ते जेधे चौक
लक्ष्मी रस्ता संत कबीर चौकी ते टिळक चौक (अलका चित्रपटगृह चौक)
बगाडे रस्ता सोन्या मारूती चौक ते फडके हौद चौक
गुरूनानक रस्ता देवजीबाबा चौक, हमजेखान चौक ते गोविंद हलवाई चौक
6 सप्टेंबरच्या सकाळी 10 पासून ते 7 सप्टेंबर रोजी मिरवणूक संपेपर्यंत
गणेश रस्ता : दारूवाला पूल ते जिजामाता चौक
केळकर रस्ता : बुधवार चौक ते टिळक चौक
पेशवे उद्यान सारसबाग, पाटील प्लाझा पार्किंग, दांडेकर पूल ते गणेशमळा, गणेशमळा ते राजाराम पूल, नीलायम चित्रपटगृह, मराठवाड़ा कॉलेज दुचाकी आणि चारचाकी शिवाजी आखाडा वाहनतळ, एआयएसएसपीएमएस मैदान, स. प. महाविद्यालय, संजीवनी मेडिकल कॉलेज मैदान, फर्ग्युसन महाविद्यालय, जैन हॉस्टेल बीएमसीसी रस्ता मैदान, नदी पात्र भिडे पूल ते गाडगीळ पूल.
अनंत चतुर्दशीला शनिवारी (6 सप्टेंबर) रात्री बारा वाजल्यापासून ते रविवारी (7 सप्टेंबर) रात्री बारा या 48 तासांच्या दरम्यान शहरात सर्व जड वाहनांना प्रवेश बंदी असणार आहे.
देशभरात यंदा गणपती मिरवणूकांचा जल्लोष पहायला मिळणार असून 6 सप्टेंबर रोजी शनिवारी गावोगावी आणि घरोघरी बाप्पाला वाजत गाजत निरोप दिला जाईल .पुण्याच्या पारंपरिक गणपती विसर्जनासाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. मानाच्या पाच गणपती बाप्पासह इतर गणेश मंडळांसाठी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. पुण्यात विसर्जनादिवशी होणाऱ्या गर्दीच्या पाश्वभूमीवर यंदा विसर्जनाच्या वेळा प्रशासनानं ठरवून दिल्या आहेत. पुण्यातील गणेशोत्सवाचा उत्कर्षबिंदू असलेली विसर्जन मिरवणूक यंदा ठरावीक वेळापत्रकानुसार पार पडणार आहे. पोलिस प्रशासन आणि गणेश मंडळांना नियमावली कळवण्यात आली असून यंदा शिस्तबद्ध आणि सुरक्षित पद्धतीने मिरवणूक पार पडावी यासाठी विशेष खबरदारी घेण्यात आली आहे.
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- पुणे
- Pune Ganpati Visarjan 2025 Live Update : पुण्यातल्या विसर्जन मिरवणुकीने मागच्या वर्षीचा रेकॉर्ड मोडला; 28 तास उलटून गेले मिरवणूक सुरूच