पुणे: पुण्यातील मानाच्या गणपतीचे विसर्जन अतिशय संथ गतीनं सुरु आहे. विसर्जन (Ganapati Visarjan) मिरवणूक सुरू झाली त्या मंडईच्या टिळक पुतळ्यापासून दोनशे मीटर अंतरावर असणाऱ्या बेलबाग चौकात पाचवा मानाचा गणपती पोहचायला पाच तास लागले आहेत. पहिला मानाचा गणपती कसबा गणपतीची मिरवणूक बरोबर साडे दहा वाजता सुरु झाली. त्या पाठोपाठ तांबडी जोगेश्वरी, गुरुजी तालीम आणि तुळशीबाग तासाभराच्या फरकाने दोनशे मीटर वर असणाऱ्या बेलबाग चौकात पोहचले.


 शेवटचा अर्थात पाचवा मानाचा गणपती असणारा केसरीवाडा साडे तीन वाजता बेलबाग चौकात पोहचला. तिकडे याच बेलबाग चौपातून दीड किलोमीटर अंतरावर असणाऱ्या अलका चौकात अद्याप मानाचा पहिला कसबा गणपती ही पोहचलेला नाही. त्यामुळं यंदा ही पुण्यातील गणपती विसर्जनाच्या (Ganapati Visarjan) मिरवणुका किती तास चालणार? याबाबत चर्चा सुरू झाली आहे. 


गणपती विसर्जन मिरवणूक 10:30 वाजता सुरू झाली


मानाचा पहिला - कसबा गणपती


10:30 - मिरवणुकीची सुरुवात


11:10 - बेलबाग चौकात 


3:35 - अल्का चौक


मानाचा दुसरा - तांबडी   जोगेश्वरी


10:40 - मिरवणुकीला सुरुवात


12:00 -बेलबाग चौक


मानाचा तिसरा - गुरुजी तालीम


11:10 - मिरवणुकीला सुरुवात


1:12 - बेलबाग चौक


मानाचा चौथा - तुळशीबाग


11:50 - मिरवणुकीला सुरुवात


2:20 - बेलबाग चौक


मानाचा पाचवा - केसरीवाडा


12:25 - मिरवणुकीला सुरुवात


3:23 - बेलबाग चौक


श्रीमंत दगडूशेठ हलवाई विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणार


पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची आरती सुरू आहे. थोड्याच वेळात विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणार आहे. तर मानाचा पहिला गणपती अलका टॉकीज चौकात दाखल झाला आहे. दरवर्षी पेक्षा 15 मिनटे आधी कसबा गणपती दाखल झाला आहे. मिरवणूक सुरू झाल्यापासून पाच तास उलटून गेल्यावर पहिला मानाचा कसबा गणपती अलका चौकात पोहचला आहे, त्यामुळे दरवर्षी प्रमाणे विसर्जन मिरवणुका उशिरापर्यंत चालणार का असा प्रश्न उपस्थित झाला आहे.