पुणे : पुण्यातील विमानतळ परिसरातून एका घृणास्पद प्रकार उघडकीस आला आहे. घराशेजारीच राहणाऱ्या एका 20 वर्षीय तरुणाने 5 वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केले. पीडित चिमुरडीच्या वडिलांनी याप्रकरणी फिर्याद दिली असून आरोपी नराधमाविरोधात विमानतळ पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्याला अटकही केलीय. शनिवारी सकाळी हा प्रकार घडला आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी शनिवारी सकाळी घरात एकटीच असल्याचे पाहून आरोपीने तिला घराबाहेर बोलावले. त्यानंतर एका इमारतीच्या कार पार्किंगमध्ये घेऊन जात कारच्या आडोशाला तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. दरम्यान घरी गेल्यानंतर चिमुरडीने हा प्रकार कुटुंबियांना सांगितला. त्यानंतर कुटुंबीयांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करीत आरोपीला अटक केली. विमानतळ पोलिस अधिक तपास करत आहेत.



लहान मुलीचा हात पकडणे किंवा पॅण्टची चेन उघडणे म्हणजे लैंगिक शोषण नाही : हायकोर्ट


एखाद्या लहान मुलीचा हात पकडणे किंवा पॅण्टची चेन उघडणे ही गोष्ट लैंगिक शोषणाअंतर्गत येत नाही, असं निरीक्षण हायकोर्टानं नुकतच एका निकालात नोंदवलं आहे. पोक्सो अंतर्गत या गोष्टींना लैंगिक शोषण म्हणता येणार नाही, असं स्पष्ट करत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील न्यायमूर्ती पुष्पा गनेडीवाला यांनी एका 50 वर्षीय व्यक्तीला पोक्सोतून दोषमुक्त केलं आहे. या आरोपीवर एका पाच वर्षीय मुलीवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप होता.


संबंधित बातम्या :



POCSO case: पॉक्सो खटल्याबाबत वादग्रस्त निकाल प्रकरण, कोलेजियमची शिफारस केंद्र सरकारने नाकारली


लैंगिक शोषणाच्या हेतूशिवाय लहान मुलांच्या गालांना स्पर्श करणं 'पोक्सो' अंतर्गत गुन्हा नाही!


'पोक्सो' प्रकरणात आईची साक्ष महत्वाचीच, तो आरोपी दोषी : हायकोर्ट


पॅन्टची झीप उघडी ठेवणे म्हणजे लैंगिक अत्याचार नाही.. नागपूर खंडपीठाच्या निर्णयावरुन विधी क्षेत्रात मतमतांतरे