पुणे : पुण्याच्या बालेवाडीत स्लॅब कोसळून झालेल्या नऊ कामगारांच्या मृत्यू प्रकरणी 10 जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. शुक्रवारी सकाळी बांधकाम सुरु असलेल्या एका इमारतीच्या चौदाव्या मजल्याचा स्लॅब कोसळल्याने नऊ मजुरांचा जागीच मृत्यू झाला होता.
कोणाकोणावर गुन्हा दाखल?
1. अरविंद जैन, बिल्डर
2. श्रवण अग्रवाल, बिल्डर
3. कैलास वाणी
4. शाम शेंडे
5. महेंद्र कामत
6. भाविन शहा
7. ज्ञानेश्वर चव्हाण, आर्किटेक्ट
8. संतोष चव्हाण, आर्किटेक्ट
9. प्रदीप कुसुमकर, स्ट्रक्चरल इंजिनीयर
10. हंसल पारिख
बालेवाडीच्या किर्लोस्कर कमिन्स ऑफिससमोरील या इमारतीचं काम सुरु होतं. मात्र त्याचवेळी चौदाव्या मजल्याचा स्लॅब कोसळला. या दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली दबल्याने नऊ जणांचा जागीच मृत्यू झाला.
पार्क ग्रांजर आणि पार्क एक्स्प्रेस नावाच्या सोसायटीच्या साईट्स होत्या. त्यातील पार्क एक्स्प्रेस या इमारतीचा स्लॅब कोसळला. अरविंद जैन, श्रवण अगरवाल या दोन बिल्डर्सच्या प्राईड पर्पल बांधकाम कंपनीचे हे दोन्ही प्रोजेक्ट्स आहेत.