पुणे: पुण्यातून भीषण अपघाताची (Pune Accident News) बातमी समोर आली आहे. पुण्यातील खडकी भागात कार आणि एसटी बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, तर एकूण 6 जण गंभीर जखमी झाले आहेत. आज (रविवारी) सकाळी ९ वाजता हा अपघात घडला आहे. पुण्यातील खडकी भागात आज सकाळी एसटी बसने चार चाकीला धडक दिली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली.


या अपघातात (Pune Accident News) जखमी झालेल्यांना जवळच्या रुग्णालय उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. या आपघातात कारचं आणि बसचं मोठं नुकसान झालं आहे. बसवरील नियंत्रण सुटल्याने बस चालकाकडून हा भीषण अपघात झाला आहे.


स्वामींच्या दर्शनाला निघालेल्या मित्रांवर काळाचा घाला


देवदर्शनासाठी निघालेल्या मित्रांवर काळाने घाला घातला आहे. देवदर्शनासाठी जात असताना कंटेनरने तीन जणांना चिरडत चारचाकी गाडीला जोरदार धडक दिल्याची घटना समोर आली आहे. अपघातात (Pune Accident News) एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. दौंड तालुक्यातील पुणे सोलापूर महामार्गावर हा भीषण अपघात झाला आहे.


दुरुस्तीसाठी थांबलेल्या स्विफ्ट कारला कंटेनरने पाठीमागून जोरदार धडक दिली आहे. ही दुर्दैवी अपघाताची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. रोहित पोकळे असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना बुधवारी सकाळच्या सुमारास घडली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. 


पुणे जिल्ह्यातील पौड जवळ एक हेलिकॉप्टर क्रॅश


पुणे जिल्ह्यातील पौड जवळ एक हेलिकॉप्टर क्रॅश (Pune Helicopter Crash) झाल्याची माहिती समोर आली आहे. ही दुर्घटना खराब हवामानामुळे घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या हेलिकॉप्टरमध्ये (Pune Helicopter Crash) पायलटसोबतच 4 जण होते, ते यामध्ये जखमी झाले आहेत. या घटनेचं वृत्त समजताच परिसरात मोठी गर्दी झाली आहे. 


घटनेबाबत प्रत्यक्षदर्शींनी दिली माहिती


हेलिकॉप्टर (Pune Helicopter Crash) काही वेळ घोटावड्याच्या दिशेने आकाशात घिरट्या घालत होतं. अचानक ते खाली पडल्याचा मोठा आवाज आला. त्यामध्ये चार जण होते, 2 जण गंभीर जखमी आहेत. पोलिस देखील घटनास्थळी दाखल झाले आहे. स्थानिक आणि आजुबाजूचे लोक मदतीसाठी आले आहे, पायलट बोलण्याच्या मनस्थितीत नाही. त्यांना उपचारांसाठी रूग्णालयात नेलं जाईल. त्या ठिकाणी 200-300 ग्रामस्थ  घटनास्थळी दाखल झाले आहेत. कोसळलेल्या हेलिकॉप्टरच्या आजूबाजुला न जाण्याचं आवाहन पायलटनी नागरिकांना केलं आहे. कारण या हेलिकॉप्टरचा कोणत्याही क्षणी स्फोट होऊ शकतो, असंही त्यांनी म्हटलं आहे.