पुणे : पुणे जिल्ह्यातील चार लोकसभा मतदार संघाच्या (pUNE NEWS)उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi Sabha In Pune सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. येत्या सोमवारी म्हणजेच 29 एप्रिलला पुण्यात मोदींची सभा होणार आहे. मोदींच्या या पुणे दोऱ्यामुळे पुण्यात अनेक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. पुणे शहर परिसरात अवकाश उड्डाणावर निर्बंध लावण्यात आले आहेत, असे आदेश आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी जारी केले आहेत. 


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 29 आणि 30 एप्रिल रोजी नियोजित पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अति महत्वाच्या व्यक्तींची सुरक्षा तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी 27 एप्रिल रोजी रात्री 12 वाजल्यापासून ते 30 एप्रिल रोजी रात्री 12 वाजेपर्यंत पुणे शहर परिसरात पॅराग्लायडींग, हॉट बलुन सफारी, ड्रोन, मायक्रोलाईट एअरोप्लेन इत्यादी प्रकारच्या अवकाश उड्डाणावर निर्बंध घालण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी जारी केले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर भारतीय दंड संहिता 1860  कलम 188 च्या  दंडनियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही असेही जिल्हाधिकारी यांच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.


पुण्यातील रेस कोर्स मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा होणार आहे. या सभेसाठी महायुतीकडून मोठं आयोजन करण्यात येत आहे. त्यासोबतत भाजपच्या पदाधिकारी आणि नेत्यांच्या बैठका सुरु आहेत. प्रत्येक स्थानिक नेत्यांकडून मोठी तयारी केली जात आहे. पदाधिकाऱ्यांना सभेला उपस्थित राहण्याचं आवाहन केलं जात आहे.


मुरलीधर मोहोळ अन् इतर तीन उमेदवारांसाठी सभा


पुणे लोकसभेसाठी महायुतीकडून मुरलीधर मोहोळांच्या नावाची घोषणा करण्यात आली. त्यावेळी मुरलीधर मोहोळ एकहाती निवडणूक गाजवणार अशी चर्चा होती . मात्र त्यानंतर महाविकास आघाडीने आपला मोहरा बाहेर काढला अन् भाजपच्या 40 वर्षांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावून विधानसभेच्या पोटनिवडणुकीत कसबा काबीज केलेल्या रवींद्र धंगेकरांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यानंतर भाजपचं काही प्रमाणात टेन्शन वाढलं. शुअर असलेल्या जागेसाठी धंगेकरांमुळे आता भाजपला प्रचंड कस लावावा लागत आहे. त्यामुळे शक्तीप्रदर्शन आणि महयुतीच्या मोठ्या नेत्यांत्या सभेसोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा होणार आहे. मोदी पुणेकरांना मतदानाचं आवाहन करणार आहेत. 


इतर महत्वाची बातमी-


AjIt Pawar And Sanjog Waghere : अण्णा बनसोडेंच्या लेकीच्या लग्नात अजित पवार-संजोग वाघेरे समोरा-समोर, वाघेरे थेट पडले, दादा अवघडले!


 


Jayant Patil : जयंत पाटील खरे खलनायक, विशाल पाटलांना काँग्रेसचं तिकीट न मिळण्यामागे त्यांचाच हात, भाजपच्या माजी आमदाराचा आरोप