Continues below advertisement


पुणे: दिनानाथ मंगेशकर रुग्णालय (Deenanath Mangeshkar Hospital) गर्भवती महिला तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात इंडियन मेडिकल असोसिएशन डॉ. सुश्रुत घैसास (Dr. Sushrut Ghaisas) यांच्या पाठीशी असल्याचं दिसून येत आहे. या प्रकरणात डॉ. घैसास यांची चूक नसून त्यांना दोषी ठरवणं चुकीचं असल्याचं, इंडियन मेडिकल असोसिएशनचे महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. संतोष कदम यांनी आयएमएची बाजू मांडली आहे. इंडियन मेडिकल असोसिएशन डॉ. घैसास (Dr. Sushrut Ghaisas) यांच्यासोबत असल्याचं स्पष्ट केलं आहे.(Deenanath Mangeshkar Hospital) 


 दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात (Deenanath Mangeshkar Hospital) गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणात ट्रीटमेंट करत असलेले आणि या सगळ्या प्रकरणात समोर आलेले डॉ. सुश्रुत घैसास (Dr. Sushrut Ghaisas) यांच्या पाठीशी इंडियन मेडिकल असोसिएशन उभा राहिला आहे. डॉ. घैसास (Dr. Sushrut Ghaisas) यांना या सगळ्या प्रकरणात रुग्णालय प्रशासनासोबत दोषी ठरवले जात असताना आणि त्यांच्यावर आरोप केले जात असताना महाराष्ट्र इंडियन मेडिकल असोसिएशनने आपली भूमिका मांडली आहे. 


महाराष्ट्र इंडियन मेडिकल असोसिएशनने आपण डॉ. घैसास (Dr. Sushrut Ghaisas) यांच्यासोबत असून त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारची या प्रकरणात चूक झाली नसल्याचं महाराष्ट्र आयएमएचे अध्यक्ष डॉ. संतोष कदम यांनी सांगितलं आहे. त्यामुळे इंडियन मेडिकल असोसिएशनने सुश्रुत घैसास पूर्णपणे पाठींबा दिला आहे. डॉ. घैसास (Dr. Sushrut Ghaisas) यांनी संबंधित गर्भवती महिलेला आतापर्यंत योग्य ट्रीटमेंट दिली होती, शिवाय ट्रीटमेंट देत असताना काही सूचना वेळोवेळी केल्या होत्या. मात्र, डॉक्टरांचे न ऐकता काही निर्णय संबंधित महिलेने आणि त्यांचे कुटुंबीयांनी घेतल्याने जेव्हा महिलेची प्रकृती सिरीयस झाली तेव्हा सुद्धा डॉ. घैसास यांनी महिलेला मदत करण्याची तयारी दर्शवली होती.


डॉ. घैसास यांच्यावर पैसे मागितल्याचा जो आरोप होतोय त्यावर सुद्धा आक्षेप आहे. आयएमएनए स्पष्टीकरण देताना डॉ. ऍडमिट करून घेत असताना लागणारा खर्च महिलेच्या कुटुंबासमोर ठेवला. त्यामुळे घैसास यांची कुठे या प्रकरणात चूक नसताना त्यांनी आपलं काम योग्य पद्धतीने केला असल्याचं इंडियन मेडिकल असोसिएशनचे म्हणणं आहे. महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने जरी त्यांना नोटीस पाठवली असली तरी चौकशीमध्ये ते निर्दोष म्हणून सिद्ध होतील. त्यामुळे या सगळ्या प्रकरणात शासन जरी चूक कोणाची हे जरी अहवालाचा अभ्यास करून समोर आणणार असलं तरी डॉक्टर संघटना इंडियन मेडिकल असोसिएशन डॉ. घैसास यांच्या सोबत असल्याचं आयएमएने सांगितले आहे.