Deenanath Mangeshkar Hospital: मंगेशकर रुग्णालयाने आमची बदनामी केली, केळकरांनी दिलेली माहिती खोटी; तनिषा भिसेंच्या कुटुंबीयांनी रेशनकार्ड दाखवून सगळंच बाहेर काढलं

Deenanath Mangeshkar Hospital: तनिषा भिसे यांचा दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात रक्तस्राव होऊन मृत्यू झाला होता. डिपॉझिट न भरल्याने दीनानाथ रुग्णालयाने त्यांच्यावर उपचार केले नाहीत

Continues below advertisement

पुणे: दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात डिपॉझिटअभावी गरोदर महिलेला उपचार नाकारण्यात आले होते. त्यामुळे या महिलेचा मृत्यू झाला होता. यानंतर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाविरोधात (Deenanath Mangeshkar Hospital) संतापाची लाट उसळली होती. तसेच मृत तनिषा भिसे (Tanisha Bhise Death) यांच्या कुटुंबीयांवरही दुसऱ्या बाजूने काही आरोप करण्यात आले होते. या सगळ्या आरोपांचे खंडन भिसे कुटुंबीयांनी 'एबीपी माझा'ला दिलेल्या मुलाखतीत केले आहे. पुण्यातील तनिषा भिसे प्रकरणात भिसे कुटुंबियांना रेशन कार्डवरून ट्रोल करण्यात आलं आणि हेच रेशन कार्ड भिसे कुटुंबीयांनी  'एबीपी माझा'ला दाखवले 

Continues below advertisement

आमदाराच्या पीएला 30 हजार पेक्षाही कमी मानधन असतं. आमदाराचा पीए म्हणजे सगळे वाईट काम करणारा नसतो अनेक आमदाराचे पीए प्रामाणिक काम देखील करतात. वार्षिक उत्पन्न 300000 पेक्षाही कमी आहे. महाराष्ट्रातल्या सगळ्या आमदारांच्या स्वीय सहायकांनी देखील या लढ्यात सहभाग घेतला आहे. आमदाराचा स्वीय सहाय्यक असला तरीही इमानदारीने काम करणाऱ्या माणसाकडे एवढे पैसे नसतात.ज्या दिवशी दीनानाथ रुग्णालयात दहा लाख रुपये मागितले, त्यादिवशी आम्ही जागेवर तीन लाख रुपये द्यायला तयार होतो आणि सात लाख रुपयांची व्यवस्था आमदार अमित गोरखे हे करत होते, असे भिसे कुटुंबीयांनी सांगितले. 

दीनानाथ रुग्णालयातही तनिषा भिसे यांच्या डिलिव्हरीची सगळी तयारी सुरु होती. त्यादिवशी अनेक मोठ्या लोकांनी दीनानाथ रुग्णालयात फोन केले होते आणि एवढे मोठे लोक फोन करत असेल तर त्यांनी पैशाची गॅरंटी घ्यायला हवी होती. या सगळ्या दरम्यान वारंवार आमचे मीडिया ट्रायल घेतले जात आहे. आम्हाला अनेकांकडून चौकशीसाठी बोलावलं जात आहे. सोबतच कुटुंबीयांना मानसिक त्रासातून देखील जावे लागत आहे. सोशल मीडियावरील ट्रोलर्स न्याय मागणाऱ्याला गुन्हेगार ठरवत आहेत आणि गुन्हेगाराला संरक्षण देत आहेत. आमच्या दोन्ही मुली पोरक्या झाल्या आहेत. रुग्णालयाचे सीसीटीव्ही समोर आणले तर या सगळ्या गोष्टी सत्य आहे हे समोर येईल.  अमित गोरखे आणि देवेंद्र फडणवीस यांनाही आम्ही भेटलो आणि त्यांच्याकडून आम्हाला न्याय मिळेल अशी अपेक्षा असल्याचे भिसे कुटुंबीयांनी म्हटले.

डॉ. केळकर अन् रुग्णालय प्रशासनाचा अहवाल खोटा, आमची बदनामी केली जातेय; भिसे कुटुंबीयांचा आरोप

महाराष्ट्र शासन खूप चांगल्या पद्धतीने मदत करते आणि आम्हाला न्याय मिळेल यासाठी ही मदत करते पण आता ससूनचा अहवाल यावर उत्तर देणार आहेत आणि ससूनचा अहवाल तातडीने सादर करावा आणि न्याय मिळावा अशी अपेक्षा आहे. ससून रुग्णालयाचा अहवाल का लांबवला जातोय, याचाही उत्तर द्यावं आणि तोही अहवाल तातडीने सादर करून निश्चित कारवाई करावी आणि कठोर कारवाई करावी. डॉक्टर केळकर आणि दीनानाथ रुग्णालयाने जी काही पत्रकार परिषदेत माहिती दिली किंवा प्रसिद्धीपत्रक काढलं ते खोटं आहे. दीनानाथ रुग्णालयाने काढलेल्या प्रसिद्धी पत्रात आमची बदनामी करण्यात आली आणि चार डॉक्टरांच्या अंतर्गत समितीने ही आमची बदनामी केली. तनिषा वहिनीसारखा दुसरं कोणतही प्रकरण महाराष्ट्रात पुन्हा होऊ नये त्यासाठी  आमचा हा लढा आहे, अशी भावना भिसे कुटुंबीयांनी व्यक्त केली. 

 डॉ. सुश्रुत घैसासांनीच आम्हाला IVF ट्रिटमेंट करायला सांगितली: भिसे कुटुंबीय

सगळ्या कुटुंबीयांनी मिळून आयव्हीएफ करण्याचा निर्णय घेतला होता. डॉक्टर घैसास यांनीच आम्हाला आयव्हीएफ करण्यासाठी विश्वास दिला होता. वहिनींना ओवरीमध्ये सीस्ट होतं आणि ते कधीच काढून टाकण्यात आलं होतं, त्याचा कोणताही आता त्रास होत नव्हता.  डॉक्टरांनी आम्हाला मूल दत्तक घेण्याचा कोणताही सल्ला दिला नव्हता. तनिषा भिसे त्यांचे पती आणि संपूर्ण भिसे कुटुंब यांनी एकत्र मिळून आयव्हीएफ करण्याचा आणि मूल जन्माला घालण्याचा निर्णय घेतला होता.  

 
डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्या पत्नीकडे आयबीएफ करण्यासाठी सांगितलं होते. मात्र, विमान नगर मधील इंदिरा आयव्हीएफ सेंटरमध्ये IVF करण्याचा निर्णय कुटुंबीयांनी घेतला. आता प्रशासनाने मुद्दा न भरकटवता तातडीने निर्णय घेऊन सगळे अहवाल एकत्र आणून कठोरातील कठोर कारवाई करावी. आयव्हीएफबाबत आम्हाला यापूर्वी कोणतीही फार माहिती नव्हती, त्याची सगळी माहिती डॉक्टर घैसास यांनी दिली आणि त्यांनीच आयव्हीएफ करण्याचा सल्लाही दिला. 

 
पोलिसांकडे आम्ही सगळे पुरावे दिले आहेत आणि ससून रुग्णालयाकडेही सगळे पुरावे आहेत त्यामुळे त्यांनी तातडीने कारवाई करण्यात आता गरजेचं आहे. यात सरकारने किंवा बाकी कोणीही वेळकाढूपणा करू नये आणि मुद्दा भरकटवण्याचा प्रयत्न करू नये. सामान्य कुटुंबातील लोक आहोत आणि या सगळ्याला समोर जाणं आमच्यासाठी फार अवघड झाले आहे.  रुग्णालयाने कुटुंबावर जे आरोप केले आहेत, त्याचा कोणताही वैद्यकीय पुरावा रुग्णालयांना दिला नाही, असा दावा भिसे कुटुंबीयांनी केला.

आणखी वाचा

दीनानाथ रुग्णालयात लोकांचे कपडे बघूनच प्रवेश देतात, रवींद्र धंगेकरांचा खळबळजनक आरोप

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola