पिंपरी चिंचवड: वेंकिज कंपनीचे संचालक बालाजी राव यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित पार्टीत ध्वनी प्रदुषण कायद्याचे उल्लंघन केलं जात आहे. पिंपरी चिंचवड पोलिसांच्या बावधन पोलिस ठाण्यात आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्याच्या बावधन परिसरात असलेल्या कोकाटे वस्ती परिसरात प्रसिद्ध वेंकिज कंपनीचे संचालक बालाजी राव यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या पार्टीत मोठ्या प्रमाणावर ध्वनी प्रदुषण झाल्या प्रकरणी आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


बावधन पोलिस ठाण्याच्या हद्दीत 8 डिसेंबरच्या रात्री 11.30 ते मध्यरात्री 2.30 च्या दरम्यान ही पार्टी झाली होती, त्यात संचालक बालाजी राव स्वत: हा उपस्थित होते, त्यांनी केक देखील कापला होता. दरम्यान या ठिकाणी मोठमोठ्याने प्रसिद्ध गायकाचे लाईव्ह कार्यक्रम लाऊड स्पिकर आणि एलईडी लावल्याने या भागातील रहिवाशांनी ध्वनी प्रदुषणचा त्रास जाणवू लागला. या कार्यक्रमाच्या आयोजकांवर गुन्हा दाखल करावा यासाठी परिसरातील 100 पेक्षा अधिक जेष्ठ नागरिक बावधन पोलिसांत गेले होते. आता या प्रकरणी बावधन पोलिसांनी आयोजक आदिनाथ संभाजी मते यांच्या वर भा.न्या. सं . 292, 293 आणि ध्वनी प्रदुषण 3,4 तसेच पर्यावरण संरक्षण कायद्या अंतर्गत 33 आर 131 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


नेमकं काय म्हणाले पोलिस?


पोलिसांनी याबाबत माहिती देताना सांगितलं की, बावधान पोलिस ठाण्याच्या अंतर्गत 8 डिसेंबरच्या रात्री एका वाढदिवसाच्या पार्टीचे आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये वाढदिवसाच्या पार्टी दरम्यान दोन्ही प्रदूषण आणि वेळेचं मर्यादा पलीकडे स्पीकर आणि डीजेचा वापर करून सार्वजनिक उपद्रव केला. याबाबत एफ आय आर दाखल करण्यात आले आहे. कोकाटे वस्ती बावधन या ठिकाणी या पार्टीचा आयोजन करण्यात आलं होतं. बावधनच्या काही नागरिकांनी याबाबतची तक्रार दिली होती. सोसायटी पासून जवळ असलेल्या कोकाटे वस्ती या ठिकाणी खाजगी जागेवर या वाढदिवसाच्या पार्टीचे नियोजन करण्यात आले होते. स्पीकर आणि डीजेचा उपद्रव सहन करावा लागला. त्या अनुषंगाने कायदेशीर कारवाई करावी असं तक्रारदारांचं म्हणणं आहे. त्यांनी याबाबत निवेदन दिले आहे त्यांनी निवेदनावरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे