पुणे : राज्यातल्या महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या आणि सर्वांचं लक्ष लागून राहिलेल्या शिरूर मतदारसंघामध्ये (Shirur Lok Sabha Election) मोठ्या उलथापालथी घडत आहेत. अजित पवारांच्या एका आमदाराने मावळमध्ये शिवसेनेच्या खासदाराला विरोध केल्यानंतर आता तोच कित्ता शिरूरमध्येही गिरवला जाणार असल्याचं चित्र आहे. कारण मंचरमधील अजित पवारांच्या (Ajit Pawar) मेळाव्यात त्यांच्याच पक्षाचे आमदार दिलीप मोहिते हे अनुपस्थित राहिल्याचं दिसून आलं. आढळरावांचा (Shivajirao Adhalrao Patil) राष्ट्रवादीतील प्रवेश आणि त्यांना शिरूरची उमेदवारी देण्यात येणार असल्याच्या चर्चेनंतर आमदार दिलीप मोहिते (Dilip Mohite) नाराज असल्याचं दिसून येतंय. दिलीप मोहिते हे आढळराव पाटलांचे (Shivajirao Adhalrao Patil) कट्टर विरोधक समजले जातात. 


कुटुंबातील लग्न असल्यानं मी आजच्या सभेला आलो नाही, मी नाराज नाही असं स्पष्टीकरण दिलीप मोहिते यांनी दिलं असलं तरी त्यांच्या अनुपस्थितीची चर्चा मात्र सध्या जोरदार सुरू आहे.


दिलीप मोहिते हे आढळरावांचे कट्टर विरोधक 


अजित पवारांच्या राष्ट्रवादी कॉग्रेसचा मंचरमध्ये शेतकरी मेळावा पार पडतोय. पण खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटीलांच्या गैरहजरीमुळे नाराजीनाट्याची चर्चा रंगलीय. मविआचे सरकार असताना सर्वाधिक बिघाडी शिरूर लोकसभेत पाहायला मिळाली होती. शिवाजी आढळराव आणि दिलीप मोहितेंमधील संघर्ष तेव्हा राज्याने पाहिला होता. 


अशा परिस्थितीत अजित पवार शिरूर लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आढळरावांचा पक्षप्रवेश घेणार असल्याची चर्चा आहे. अमोल कोल्हेचा पराभव करण्यासाठी अजित पवार हे पाऊल टाकणार आहेत. पण त्यांच्याच पक्षाचे आमदार दिलीप मोहितेंना हे पचनी पडलेलं नाही अशी चर्चा सर्वत्र रंगलेली आहे. म्हणूनच अजित पवारांच्या उपस्थित पार पडणाऱ्या शेतकरी मेळाव्याकडे मोहितेंनी मेळाव्याकडे पाठ फिरवलेली आहे.


मोहिते म्हणतात, लग्नकार्यात व्यस्त


दिलीप मोहिते यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हणाले, कुटुंबातील लग्न असल्यानं मी आजच्या सभेला आलो नाही. मी नाराज नाही. शिवाजी आढळराव आमच्या महायुतीत आहेत. त्यामुळं आज त्यांनी अजितदादांच्या गाडीतून प्रवास केला असेल.


शरद पवारांच्या सभेला सभेने उत्तर 


शरद पवारांच्या सभेनंतर आज अजित पवारांची सभा होत आहे. शरद पवारांची शिरूर लोकसभेतील मंचरमध्ये 21 फेब्रुवारीला सभा झाली होती. त्यावेळी शरद पवारांसह जयंत पाटील, अमोल कोल्हे आणि रोहित पवारांनी चहुबाजूंनी टीका केली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री दिलीप वळसे पाटलांसह शिवाजी आढळरावांवर निशाणा साधण्यात आला होता. या सर्वांना अजित पवार आणि दिलीप वळसे यांनी उत्तर दिलं. 


ही बातमी वाचा: