Devendra Fadnavis : भाजप नेते हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांची उपमुख्यमंत्री अजित पवारांबाबत (Ajit Pawar) असलेली नाराजी दूर करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadavis) यांनी प्रयत्न केले होते. त्यानंतर देवेंद्र फडणवीस आज इंदापुरात भाजपच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी दाखल झाले आहेत. इंदापुरात (Indapur) दाखल होताच देवेंद्र फडणवीस यांनी हर्षवर्धन पाटलांच्या नाराजीवर वक्तव्य केले आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आम्ही तीन पक्ष एकत्र आलो आहोत. विशेषतः राष्ट्रवादीसोबत आमची लढत झाली आहे. त्यामुळे समन्वय साधावा लागतो. समन्वय साधण्याचा आमचा निश्चितपणे प्रयत्न सुरु आहे. राष्ट्रवादीशी (NCP) उत्तम समन्वय आहे. सर्वांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आम्हाला विश्वास आहे की आम्ही एकत्रितपणे निवडणूक (Lok Sabha Election 2024) लढवू, अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली आहे.
सर्वांना न्याय मिळेल, अशी व्यवस्था उभी करणार
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कार्यकर्ता हा सैनिक असतो, त्यांचे एकच लक्ष असते की, आपल्या सेनापतीसाठी आपल्याला लढायचे आहे. सेनापतींचे काम असते की आपल्या सैनिकांना योग्य दिशा द्यायची, त्यामुळे कार्यकर्त्यांच्या भावना साहजिकच आहे. आमच्या सर्व सैनिकांना आम्ही निश्चितपणे समजावून सांगू शकू. त्यांचे सेनापतीदेखील त्यांना योग्य प्रकारे सांगतील. सर्वांना न्याय मिळेल, अशी व्यवस्था आम्ही उभी करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
माने दादा आणि माझे जुने संबंध
देवेंद्र फडणवीस यांनी सोनाई डेअरीचे प्रवीण माने (Pravin Mane) यांच्यासोबत चहापान केले. यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, माने दादा आणि माझे जुने संबंध आहेत. ते बऱ्याच दिवसापासून माझ्या मागे लागले होते की तुम्ही इंदापूरला येता परंतु माझ्याकडे येत नाही म्हणून मी त्यांना सांगितलं होतं की, ज्यावेळेस येईल त्यावेळेस चहा पाण्याला येईल. ते आमचे जुने सहकारी आहेत ते आमच्या सोबतच आहेत, असे त्यांनी यावेळी म्हटले आहे.
दुष्काळावरती क्लोज मॉनिटरिंग
ज्याच्याकडे नैतिक बळ असतो. तोच दुसऱ्याला भ्रष्टाचारी ठरवू शकतो. काँग्रेसकडे नैतिक बळच नाही. त्यांनी असे कॅम्पियन केलं तरी तो केविलवाना प्रयत्न ठरेल. आपण दुष्काळाचे नियोजन केलेलं आहे. पाणी राखून ठेवले आहे. आम्ही दुष्काळावरती क्लोज अशा प्रकारचे मॉनिटरिंग करत आहोत. दुष्काळाच्या बाबत ज्या उपाययोजना गरजेचे आहेत, त्या करत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
आणखी वाचा
'मविआ'शी काडीमोड, जरांगेंशी तिसरी आघाडी, उमेदवारांची अदलाबदल, वंचितच्या राजकीय भूमिकेत 'केमिकल लोचा'