Pune Marathi Church : पुणे पेशव्यांची राजधानी. कालांतराने तिथे इंग्रजही आले. पुढे इंग्रजांच्या तावडीतून भारताची सुटकाही झाली. इंग्रज निघून गेले पण त्यांच्या पाऊल खुणा आजही पुण्यात तशाच आहेत. आम्ही बोलतेय पुण्यातल्या काही चर्च बद्दल. हे चर्च 18 व्या शतकातले आहेत. (marathi church)पण आजही ती वास्तू जपण्यात आलीये. या चर्चला मराठी चर्च म्हणून ओळखलं जातं. मराठीचं आणि चर्चचं कनेक्शन काय असा प्रश्न अनेकांना पडला असेल. त्यामुळे पुण्यातील हे चर्च नेमके कोणते पाहुयात...
'जिंगल बेल जिंगल बेल जिंगल ऑल द वे', म्हणत सगळ्या समाजाचे लोक ख्रिसमस साजरा करतात. पण खरंतर पुण्यात मराठी चर्च आहेत जिथे मराठी कॅरल आणि मराठीमध्येच प्रार्थना केली जाते. पुण्यात जितक्या उत्साहात दिवाळी आणि दसरा साजरा केला जातो तितक्याच उत्साहात ख्रिसमस आणि न्यूइअर देखील साजरा केला जातो. आपण पुण्यातले असे तीन चर्च बघणार आहोत ज्यांचा आपल्या मराठी संस्कृती आणि इतिहासाशी संबंध आहे.
ब्रदर देशपांडे मेमोरियल चर्च
ब्रदर देशपांडे मेमोरियल चर्च हे चर्च गॉथिक पद्धतीने बांधलं गेलं आहे. दगडी आणि लाडकी काम इथे बघायला मिळतं. शहरात 18 व्या शतकापासूनच ख्रिश्चन मिशनऱ्यांची वर्दळ सुरू झाली होती. पेशव्यांच्या काळात कसबा पेठेत या चर्चची पहिली इमारत बांधली गेली. एकोणिसाव्या शतकापर्यंत शहरातील ख्रिश्चन बांधवांच्या संख्येत वाढ झाली होती. तेव्हाच रेव्हरंड देशपांडे पुण्यात आले. देशपांडे यांनी ख्रिश्चन धर्म स्विकारला होता. या चर्चची स्थापना 1967 साली झाली होती. त्यानंतर या चर्चमध्ये मराठी लोक यायला सुरुवात झाली होती.
पवित्र नाम देवालय चर्च
ख्रिसमसमध्ये चर्चमध्ये यायची गंमत वेगळी असते कारण आपल्याला सुंदर असं लायटिंग बघायला मिळतं. पंच हौद मिशन चर्च म्हणजेच पवित्र नाम देवालय चर्च म्हणून ओळखलं जातं. इथे आल्यानंतर सर्वात पहिले तुमचं लक्ष जाईल ते म्हणजे इथल्या 130 फुट ऊंच मनोऱ्याकडे. त्यात 8 बेल आहेत किंवा घंटा ज्या वाजवून सेलिब्रेशन केलं जातं. याची स्थापना 1885 साली झाली होती. तेव्हा पासून अनेक लोक इथे येत असतात. या बेल्सपाहण्यासाठी अनेक लोक इथे गर्दी करत असतात. हे चर्च गुरुवार पेठेत असून स्वातंत्र्यात दिवस, गणतंत्र दिवस वेळी मनोऱ्या मधील घंटा वाजवून राष्ट्रगीत म्हटले जाते. इथे अतिशय सुंदर असे नक्षीकाम केले आहे. इथले बांधकाम बॅसिलिका पद्धतीने केलं गेलं आहे.
सिटी चर्च
सिटी चर्च हे खरंतर सर्वात जून चर्च आहे, असं म्हणायला हरकत नाही. पेशव्यांनी या चर्च च्या बांधणीसाठी मदत केली होती. 1792 साली पेशव्यांनी दिलेल्या जागेवर लहानसे चर्च बांधण्यात आले. त्याला 'अवर लेडी ऑफ इमॅक्युलेट कन्सेप्शन' असं नाव मिळालं. त्याला 'सिटी चर्च' असंही म्हटलं जातं. म्हणतात की इथं पुणे शहराचं एक प्रवेशद्वार (क्वार्टरगेट) होतं. 1792 मध्ये याची स्थापना झाली. पेशवे आणि पोर्तुगीजांचा 18 व्या शतकामध्ये मोठा संबंध आलेला दिसून येतो. सैनिकी, व्यापारी आणि इतर राजकीय संबंध दोघांत असल्याचे दिसते. डॉम मिंगेल दी नोरोन्हा हे पोर्तुगीज अधिकारी पेशव्यांच्या सैन्यात काम करत होते. नोरोन्हा यांनी आपल्या ख्रिस्तीबांधवांना धार्मिक कार्यासाठी आणि प्रार्थनेसाठी चर्चची गरज असल्याची मागणी केली. त्यानुसार तेव्हा कारभार सांभाळणाऱ्या सवाई माधवरावांनी नाना पेठेतील एक भूखंड या चर्चसाठी दिला होता.
इतर महत्वाची बातमी-